Black-Panther (Pic Credit- Wikimedia Commons)

महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar) प्रसिद्ध प्रतापगड किल्ल्याजवळ (Pratapgad fort) एक ब्लॅक पँथरचे (Black Panther) दर्शन झाले आहे. ज्यामुळे वन्यजीव प्रेमी उत्साहित झाले आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, कदाचित या क्षेत्रातील हे पहिलेच दृश्य आहे. ब्लॅक पँथरचे दर्शन घडवणारी एक क्लिप व्हायरल (Clip viral) झाली आहे. मेलॅनिस्टिक बिबट्यांना सामान्यतः ब्लॅक पँथर किंवा काळा बिबट्या म्हणतात. कुमठे गावातील दोन मेंढपाळ रवींद्र जाधव आणि सुभाष जाधव यांनी त्यांच्या गुरांना प्रतापगडाच्या पायथ्याशी चरायला नेले असता त्यांना एक काळा बिबट्या दिसला. त्यांनी मेलेनिस्टिक बिबट्याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे. असे वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्याने सांगितले. 17 सप्टेंबर रोजी सकाळी लांबून काढलेल्या जवळजवळ एका मिनिटाच्या क्लिपमध्ये पूर्ण वाढ झालेला काळ्या पँथर फिरत असल्याचे पाहिले जाऊ शकते.

मात्र गुरांच्या मेंढपाळांचा आवाज ऐकून तो झाडीत नाहीसा होतो. माणसाची चाहूल लागताच हा पॅथर नाहीसा झाला आहे. मात्र त्याच्या असण्याने परिसरात दहशत  पसरली आहे. महाबळेश्वर आणि सदरील नजीकचा परिसर जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे डोंगररांगांनी इथं अनेक वन्य जीव वास्तव्यास आहेत. यामुळेच ब्लॅक पँथरचं दर्शन घडलं असावे, असे तेथील लोकामना वाटत आहे. हेही वाचा गडचिरोली मध्ये वाघाच्या हल्ल्यात 15 जणांनी गमावला जीव; Special Tiger Protection Force आणि Rapid Rescue Team कडून शोध सुरू

मे 2018 मध्ये, बेल्जियममधील एक कुटुंब आंशिक मेलेनिस्टिक बिबट्या शोधण्यासाठी भाग्यवान होते. जे सहसा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आत फक्त कोकण प्रदेश, गोवा आणि कर्नाटकातील कबिनीमध्ये आढळते. प्राण्याला कॅमेऱ्यात कैद करण्याची ही पहिलीच वेळ होती. नोव्हेंबर 2020 मध्ये, एका टूर ऑपरेटरने मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पावर सफारी करताना काळ्या बिबट्याला पाहिले. ज्याला मोगली जमीन असेही म्हटले जाते.

जुलै 2021 मध्ये, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पसरलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जनगणनेच्या अभ्यासादरम्यान कॅमेरा ट्रॅपमध्ये अशीच काळा बिबट्या दिसला. ब्लॅक पँथर पश्चिम घाट आणि ईशान्य भारताच्या जंगलात आढळतात. त्यांच्या शरीरात जास्त मेलेनिन असते. त्यांच्या फरचा रंग निळा, काळा, राखाडी आणि जांभळ्या रंगाचे मिश्रण आहे.