Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Suicide News:   छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात   तरुणांच्या दोन गटात वादविवाद झाला आणि या वादात अपमान झाल्याने एका युवकाने आत्महत्या (Suicide) केल्याचे उघजडकीस आले आहे. ठाकरे पक्षातील एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसासाठी बॅनर लावण्यात आले होते या बॅनरवरुन दोन गटात चांगलाच वाद सुरु झाला. या वादात तरुणाचा अपमान झाला आणि त्यांने आयुष्य संपवलं. या प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटूंबाने बारा जणांविरुध्दात पोलिसांत तक्रार केली आहे.

महेश गोरक्षनाथ बोबडे (25) असं आत्महत्याग्रस्त तरुणाचे होते. पैठण तालुक्यातील या घटनेमुळे परिसर हादरलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त ईसारवाडी येथील महेश गोरक्षनाथ बोबडे  आणि त्याचे मित्र बुधवारी रात्री दहा वाजता गावात वाढदिवसाचे बॅनर लावत होते. दरम्यान महेशने या बॅनरवर पाय ठेवला. बॅनरवर राष्ट्रीय महापुरुषांचा फोटो छापलेला होता. हे बघताच गावातील तरुण मंडळी संताप व्यक्त करत. याकारणांवरून त्यांच्यात भांडण सुरु झालं. महेशला मारहाण केली. दरम्यान त्याच्याकडून माफी मागण्यास भाग पाडून त्याचा व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. घरांच्याना देखील या गोष्टींचा त्रास सहन करावा लागला.

बुधवारी गावात या कारणावरून एका व्यक्तीने हे प्रकरण शांत केले. मात्र रात्री गावातील मंडळी पुन्हा मारायला येईल या भीतीने तो शेतात गेला. रात्रीच्या सुमारास त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे कुटूंबाने सांगितले. महेशच्या कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला. महेशच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.