![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/axar-patel-shubman-gill-and-shreyas-iyer.jpg?width=380&height=214)
नागपूर: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Vidarbha Cricket Association Stadium, Nagpur) खेळवला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 विकेट राखून पराभव केला. यासह भारताने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 38.4 षटकात 6 विकेट गमावून लक्ष्य गाठले.
1ST ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/B13UlBNLvn #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 6, 2025
बटलर आणि बेथेलचे अर्धशतक
तत्तपुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला कर्णधाराचा निर्णय बरोबर ठरला कारण 70+ पर्यंत एकही विकेट पडली नाही. त्यानंतर, एकामागून एक विकेट पडल्या आणि इंग्लंडला डाव सावरता आला नाही. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतके झळकावली. फिलिप सॉल्टने 43 धावांची खेळी खेळली. शेवटी, जोफ्रा आर्चर 21 धावा करून नाबाद राहिला आणि इंग्लंडने 47.4 षटकांत 10 विकेट गमावून भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले. तर भारताकडून रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा यांनी 3-3 विकेट घेतल्या. मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
शुभमन गिलची 87 धावांची शानदार खेळी
लक्ष्याचा पाठलगा करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात वाईट झाली. यशस्वी जयस्वाल 15 आणि रोहित शर्मा 2 धावा करुन बाद झाला. नंतर शुभमन गिल (87), श्रेयस अय्यर (59), आणि अक्षर पटेल यांनी (52) भारतीय संघाचा डाव संभाळला आणि भारताला विजयाजवळ घेवून गेले. त्यानंतर रवींद्र जडेजाने 38.4 षटकात विजयी चौकरा मारून भारताचा विजय निश्चित केला. दुसरीकडे, इंग्लंडकडून साकिब महमूद, आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. जोफ्रा आर्चर आणि जेकब बेथेल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 9 फ्रेबुवारीला बाराबती स्टेडियम, कटक येथे दुपारी 1.30 खेळवण्यात जाईल.