Delhi Assembly Exit Poll 2025 Result (Photo Credits: LatestLy)

दिल्ली विधानसभेसाठी मतदान (Delhi Vidhan Sabha Election) पार पडलं आहे आता निकालाचे वेध लागले आहेत. दिल्ली विधानसभेचा निकाल 8 फेब्रुवारीला लागणार आहे. सध्या राजकीय पक्षांकडून विजय आणि पराजयाच्या स्थितीमध्ये काय करता येईल याची चाचपणी करत आहे. काही राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला तर काही ईव्हीएम ला दोषी ठरवत आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोल्स (Exit Polls)  मध्ये यंदा दिल्ली मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज समोर आला आहे. 3 एक्झिट पोल्स मध्ये भाजपाला एकतर्फी यश मिळणार असल्याचं सांगितलं आहे.

दिल्लीत 70 विधानसभा जागांसाठी निकाल लागणार आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार, दिल्लीत आम आदमी पक्षाला 10-34 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपा आणि मित्रपक्षांना 36-61 जागा मिळण्याचा अंदाज आहे. कॉंग्रेसला अगदीच नगण्य जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये 0-3 जागांचा अंदाज आहे.

Axis My India exit poll, च्या अंदाजानुसार आप ला 15-25 जागा, भाजपाला 45-55 जागा तर कॉंग्रेसला 0-1 जागा मिळू शकते. Axis My India ने केलेल्या Maha Exit Poll मध्ये दिल्लीत आप ला 42%, भाजपा ला 48% आणि कॉंग्रेसला 7% आणि इतरांना 3% मतदान झाले आहे.

Chanakya Strategies exit poll नुसार, आप ला 25-28, भाजपा ला 39-44 आणि कॉंग्रेसला 2-3 जागा मिळू शकतात.

CNX exit poll च्या अंदाजानुसार, आप ला 10-19 जागा, भाजपा ला 49-61 तर कॉंग्रेसला 0-1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

DV Research exit poll ने आपला सर्वाधिक जागा दाखवल्या आहेत. त्यांना 26-34 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपाला 36-44 आणि कॉंग्रेसला 0 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

दिल्लीत भाजप+ आघाडीची संभाव्य आघाडी सत्तेत येण्याचा अंदाज आहे. AAP निवडणूक लढाईत प्रबळ दावेदार आहे. 8 फेब्रुवारी रोजी एक्झिट पोलचे निकाल खरे ठरल्यास, 27 वर्षांनंतर भाजपचे दिल्लीत सत्तेत पुन्हा येईल. दशकभर सत्ता गाजवल्यानंतर 'आप'ला विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे.