Tiger And Wild Boar Fall Into Same Well: सोमवारी संध्याकाळी एका दुर्मिळ आणि नाट्यमय घटनेत, वाघाचे पिल्लू आणि रानडुक्कर शेतातील विहिरीत पडले. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात हा असामान्य प्रकार घडला. येथे 'शिकारी आणि शिकार' दोघेही एकाचं ठिकाणी आपला जीव वाचवण्यासाठी वाट पाहताना दिसले. या वाघाला आणि रानडुक्कराला पाहण्यासाठी विहिरीभोवती गावकऱ्यांनी गर्दी केली. शिकार करण्यासाठी वाघ रानडुक्कराचा पाठलाग करत होता. परंतु, चुकून दोघं खोल विहिरीत पडले. दरम्यान, गावकऱ्यांनी वन्यजीव बचाव पथकांना घटनास्थळी बोलावले. सध्या दोन्ही प्राण्यांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
वाघ आणि रानडुक्कर एकाच विहिरीत पडले, पहा व्हिडिओ -
Unlikely pair: Tiger cub and wild boar fall into same well after chase goes wrong in #MadhyaPradesh's Seoni
Both predator and prey were forced to wait for rescue, side by side, as concerned villagers gathered around the well in shock and awe.
Know more 🔗… pic.twitter.com/P8vjNqicbr
— The Times Of India (@timesofindia) February 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)