Pak Actress Mawra Hocane Marries Ameer Gilani: 'सनम तेरी कसम' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार म्हणून चाहते उत्सुक आहे. सध्या सोशल मिडीयावर सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. दरम्यान, 'सनम तेरी कसम' मध्ये केलेल्या आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने अभिनेता अमीर गिलानीसोबत लग्न केले आहे. तिने तिच्या लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, मावरा होकेनने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये मावरा आणि आमिर पारंपारिक वेडिंग आउटफिटमध्ये दिसत आहेत. फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
मावरा आणि आमिरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह अनेक पाकिस्तानी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
येथे पाहा, विवाहाचे फोटो
View this post on Instagram
'सनम तेरी कसम' (२०१६) या बॉलिवूड चित्रपटातून मावरा होकेनला महत्त्वपूर्ण ओळख मिळाली, ज्यात तिने हर्षवर्धन राणे यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर मावराने पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीत सुंदर काम करून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.