Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 07, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Sangli Shocker: सांगली मध्ये 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या; मृतदेह पोत्यात भरून पेटीत ठेवलेला सापडला

आज 6 फेब्रुवारी दिवशी सकाळी मुलगी शाळेत जाण्याची वेळ झाली तेव्हा कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती आढळली नसल्याने गावात शोधाशोध झाली.

महाराष्ट्र Dipali Nevarekar | Feb 06, 2025 11:17 PM IST
A+
A-
Photo Credit- X

महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी बदलापूर मध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. मात्र त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराची घटना समोर आली आहे. सांगली (Sangli) मध्येही आता जत (Jat) मध्ये करजगी (Karajagi) येथे 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. नंतर या मुलीची निर्घुण हत्या करण्यात आल्याने सारा जिल्हा हादरला आहे. या प्रकरणामध्ये पांडुरंग कळळी या 45 वर्षीय व्यक्तीला अटक झाली आहे.

पोलिसांत तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला. गावात पत्र्याच्या शेड समोर झाडाखाली आरोपी पांडुरंग दारूच्या नशेत आढळला. त्याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पत्र्याच्या घरात मुलीचा मृतदेह पोत्यात भरून पेटीत भरलेल्या अवस्थेत सापडला.

पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्ट मार्टम साठी जत रूग्णालयामध्ये पाठवला. या घटनेनंतर गावातील नागरिकांकडून संपात व्यक्त केला आहे. दरम्यान आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मुंबई वांद्रे टर्मिनल्स वर महिलेवर अत्याचार

काही दिवसांपूर्वी वांद्रे टर्मिनल्स मध्ये परराज्यात मुंबईत आलेल्या एका महिलेवर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. ही महिला रिकाम्या ट्रेन मध्ये एकटीच झोपलेली पाहून एका कुलीने अत्याचार  केल्याचं समोर आलं आहे. वांद्रे टर्मिनल्स सारख्या वर्दळीच्या स्थानकावर असा प्रकार  झाल्याने आता महिला सुरक्षा वार्‍यावर आहे का? असा प्रश्न उभा राहिला आहे.

 

Women and Child Helpline Numbers: Childline India – 1098; Women’s Helpline – 181; National Commission for Women Helpline – 112; National Commission for Women Helpline Against Violence – 7827170170; Police Women / Senior Citizen Helpline – 1091/ 1291; Missing Child and Women – 1094


Show Full Article Share Now