Sri Lanka National Cricket Team vs Australia National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामन्याला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि 242 धावांनी पराभव केला. यासह, पाहुण्या संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करू इच्छितो. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर श्रीलंकेच्या संघाने 90 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या आहेत.
Kusal Mendis’ fightback takes Sri Lanka to stumps, but a two-wicket 84th over by Mitchell Starc denied them a safe passage to the end of day 1 📉
Scorecard: https://t.co/wnY2bCNw3R #SLvAUS pic.twitter.com/GCOp4nOt77
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 6, 2025
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 23 धावांवर बसला. श्रीलंकेकडून दिनेश चंडिमलने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. दिनेश चांदीमल व्यतिरिक्त कुसल मेंडिसने 59 धावा केल्या. कुसल मेंडिस नाबाद 59 धावांसह खेळत आहे आणि निशान पेरिस नाबाद 59 धावांसह खेळत आहे.
हे देखील वाचा: Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का, कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवुड स्पर्धेतून बाहेर
दुसरीकडे, स्टार गोलंदाज नाथन लायनने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. नॅथन लायन आणि मिशेल स्टार्क व्यतिरिक्त मॅथ्यू कुहनेमनने दोन विकेट घेतल्या. आता दुसऱ्या दिवशीचा खेळ आणखी रंजक झाला आहे.