Main Hoon Na 2: 'मैं हूं ना' चित्रपटाच्या यशानंतर फराह आणि शाहरुखची (Shah Rukh Khan)जोडी इंडस्ट्रीतील हिट जोडी बनली होती. गेल्या काही वर्षांपासून फराह (Farah Khan) शाहरुख खानसोबत एका प्रोजेक्टवर काम करत असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. त्या घडामोडींनंतर, 'मैं हूं ना 2' बद्दल एक अपडेट समोर आली आहे. पिंकव्हिलाच्या अहवालानुसार, रेड चिलीजच्या बॅनरखाली मैं हूं ना 2 (Main Hoon Na 2)या चित्रपटाचे काम सुरू करण्यात आले आहे. (Vicky Kaushal Talks in Marathi: विकी कौशलने आपल्या मराठीने सर्वांना केले प्रभावित; छावा चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितला चाळीचा किस्सा)
'मैं हूं ना' हा शाहरुख खान आणि गौरी खान यांनी त्यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली निर्मित केलेला पहिला चित्रपट होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये फराहने 'मैं हूं ना 2' साठी तयार केलेली कथा शाहरूखला आवडली आहे.फराह खान सध्या तिच्या लेखकांसह आणि रेड चिलीजसोबत कथेवर काम करत आहे. मात्र, अद्याप शाहरूख किंवा फराहकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (Pak Actress Mawra Hocane Marries Ameer Gilani: सनम तेरी कसम फेम पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन अडकली विवाह बंधनात, येथे पाहा लग्न सोहळ्याचे फोटो)
शाहरुख खान आणि फराह खान यांनी मैं हूं ना, ओम शांती ओम आणि हॅपी न्यू इयर सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. जर या चित्रपटाचा सिक्वेल बनवला गेला तर हा त्यांचा एकत्रित चौथा प्रकल्प असेल. सिक्वल तायर होत असल्याचे माहित झाल्यापासून चाहते चित्रपटासाठी खूप उत्साहित आहेत. दरम्यान, शाहरुख खान सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'किंग' चित्रपटातही दिसणार आहे, तो 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
फराह खानने 2004 मध्ये आलेल्या 'मैं हूं ना' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता आणि त्याच्याशिवाय झायेद खान, अमृता राव, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, सतीश शाह, बिंदू, बोमन इराणी, कबीर बेदी, नसीरुद्दीन शाह आणि किरण खेर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.