Justin and Hailey Bieber (Photo Credits: Instagram)

अनेकदा चित्रपट आणि ग्लॅमर इंडस्ट्रीतील स्टार्सच्या महागड्या घटस्फोटांची चर्चा त्यांच्या लग्नांपेक्षा जास्त होते. याआधी असे अनेक घटस्फोट समोर आले आहेत. आताही एका लोकप्रिय आंतरराष्ट्रीय गायकाच्या घटस्फोटाबद्दल चर्चा आहे. जस्टिन बीबर (Justin Bieber) आणि हेली बीबर (Hailey Bieber) यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अलीकडे काही अहवाल आणि अफवा समोर आल्या आहेत. त्यांच्या लग्नात तणाव असल्याचे आणि ते विभक्त होण्याची शक्यता असल्याचे काही माध्यमांनी नोंदवले आहे. हेलीच्या मित्रांनी जस्टिनच्या ‘अस्वीकार्य’ वर्तनामुळे तिला त्याच्यापासून दूर जाण्याचा सल्ला दिल्याचेही सांगितले जात आहे.

या घटस्फोटात, प्रसिद्ध हॉलिवूड गायक जस्टिन बीबरला पत्नीला तब्बल 300 मिलियन डॉलर्स द्यावे लागू शकतात. अशाप्रकारे हा घटस्फोट जस्टिनसाठी खूप महागात पडू शकतो. असे म्हटले जात आहे की, हेलीने त्याच्याकडे 300 दशलक्ष डॉलर्स पोटगीची मागणी केली आहे. मात्र, या अफवांच्या पार्श्वभूमीवर, जस्टिन आणि हेली न्यूयॉर्कमध्ये एका डेट नाईटसाठी एकत्र दिसले, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अधिक रंग मिळाला. अशा परिस्थितीत, त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा आणि अहवालांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे उचित ठरेल.

जस्टिन बीबर आणि हेली बाल्डविन यांचे 2018 मध्ये गुपचूप सिव्हिल मॅरेज झाले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दक्षिण कॅरोलिनामध्ये एका भव्य समारंभात पुन्हा लग्न केले. हेली बाल्डविन एक प्रसिद्ध मॉडेल असून ती सुप्रसिद्ध अभिनेता स्टीफन बाल्डविन यांची मुलगी आहे. जस्टिन बीबर आणि हेली बीबर यांनी 22 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले. त्यांच्या मुलाचे नाव जॅक ब्लूज बीबर असे ठेवले आहे. जस्टिनने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली होती. (हेही वाचा: Millie Bobby Brown Second Wedding: मिली बॉबी ब्राउन आणि Jake Bongiovi यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल)

आता लग्नाच्या 7 वर्षानंतर ते वेगळे होत असल्याचा बातम्या येत आहेत. जस्टिनच्या ड्रग्जच्या सवयींना कंटाळून हेलीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बातमीनुसार, जेव्हा हेलीने जस्टिनशी लग्न केले तेव्हा गायकाने असे वचन दिले होते की, तो नेहमीच ड्रग्जपासून दूर राहील. पण नंतर जस्टिनने त्याचे वचन पाळले नाही