चाणक्य हा शब्द कानावर पडला तरी हुशारी, बुध्दी, तल्लख अशा विविध गोष्टीं आपसूकचं मनात येतात. एखादा व्यक्ती आपली शक्कल लढवून एखादी कल्पना सुचवत असला तर आपण त्या गमतीत बरेचंदा म्हणतो की आला मोठा चाणक्य. पण खरचं चाणक्यनिती म्हणजे काय? राजनीती, अर्थव्यवस्था, राष्ट्रहित, युद्धनीती, जीवनपद्धती अशा विविध बाबींमध्ये चाणक्यनितीचा वापर करणे म्हणजे नेमक काय करणे. तर याबाबतचं सविस्तर धडे देण्यासाठी महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे. राज्यातील जनतेला चाणक्य नितीचे धडे देण्यासाठी महाराष्ट्र सरकार लोणावळ्यात चाणक्य स्मारक उभारणार असल्याची माहिती राज्य पर्यटन मंत्री मंगप्रभात लोढा यांनी दिली आहे. तरी उभारण्यात येणाऱ्या या चाणक्य स्मारकात चाणक्य नितीचे खास धडे दिल्या जाणार आहेत. तरी राज्यातील उत्सुक असलेले नागरिक या स्मारकात येवून चाणक्य नीतीचे धडे घेवू शकतात अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

 

तरी सरकारकडून या स्मारकात सर्वप्रथम चाणक्य नितीचे छोटे धडे दिल्या जाणार आहे. पर्यटक, शिक्षक आणि विद्यार्थी जे चाणक्य निती शिकण्यास उत्सुक आहेत किंवा ज्यांना चाणक्य नितीबाबत अधिकाधिक जाणून घ्यायला आवडेल अशा उत्सफूर्त नागरिकांसाठी चाणक्य नितीचे धडे दिल्या जाणार असल्याची माहिती मंगलप्रभआत लोढा यांनी दिली आहे. तिसर्‍या शतकातील प्रसिद्ध प्राचीन भारतीय विचारवंत, ज्याला ‘कौटालिया’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी उत्कृष्ट ‘अर्थ-शास्त्र’ लिहिले, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या राजकारण, वित्त आणि परराष्ट्र व्यवहारांवरील तत्त्वज्ञानावर चर्चा केली त्यांच्याबद्दल या सेंटरमध्ये शिकवले जाईल. (हे ही वाचा:- Hop On-Hop Off Bus: मुंबईत हॉप ऑन-हॉप ऑफ बस सेवा सुरू; जाणून घ्या कुठे कराल बुकिंग)

 

आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामध्ये नातेसंबंध, पैसा, व्यवसाय आणि शिक्षण इत्यादींबद्दल बरेच काही सांगितले आहे. लोक आजही आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतात. या धोरणांचे पालन करून व्यक्ती आपले जीवन यशस्वी करू शकते. याच धोरणांच्या जोरावर आचार्यांनी एका सामान्य मुलाला चंद्रगुप्ताला सम्राट बनवले होते. तरी चाणक्यनितीचा अभ्यास करत किंवा चाणक्यनिती अवगत करत तुम्ही तुमच्या व्यावसायिक, वैयक्तिक, मानसिक, शारीरिक, भावनिक आयुष्यात मोठे बदल करु शकतात.