Aurangabad Municipal Corporation | (Photo Credits: Facebook)

औरंगाबाद महापालिका निवडणूक (Aurangabad Municipal Corporation Election) नेमकी कधी पार पडणार याबाबत अद्यापही कोणती निश्चिती नाही. मात्र, तरीही औरंगाबाद पालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी राजकीय पक्ष आपापल्या शिडात जनमताची हवा पुरेपूर भरली जाईल यासाठी कार्यरत झाले आहेत. यात सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) आणि सोबत असलेल्या महाविकासआघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षासह भाजपचाही समावेश आहे. याशिवाय मनसे (MNS), वंचित बहुजन आघाडी (VBH), एमआयएम (MIM) आणि इतरही काही स्थानिक आघाड्या यांचाही समावेश आहे. अर्थात या पक्षांनी कितीही तयारी केली तरी, जोपर्यंत प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होत नाही. तोपर्यंत राजकीय पक्षांच्या तयारीला कोणतीही निश्चित दिशा मिळणार नाही. करोना विषाणू संसर्गाच्या सावटामुळ‌े महापालिका निवडणूक कधी होणार यारच मुळी प्रश्नचिन्ह आहे. असे असले तरी यंदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगणार असे दिसते. त्यात महाविकासआघाडी मैदान मारणार की चित्र भलतेच दिसणार? याबाबतही उत्सुकता आहे.

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-युतीची सत्ता होती. मात्र, विधानसभा निवडणूक 2019 नंतर ससत्तासमिकरणाची सूत्रे बदलली शिवसेना भाजप युती तूटली. राज्यात महाविकासआघाडी सत्तेवर आली. त्याचा परिणाम राज्यातील एकूण राजकीय पटावर मोठ्या प्रमाणात झाला. औरंगाबादमध्येही सत्तेच गणीत बदलले. शिवसेना सत्तेवर राहिली. शिवसेनेला महाविकासआघाडीची साथ मिळाली. दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे भाजपा एकाकी पडला. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये भाजपाने महापालिका निवडणुकीत मिश 60 प्लस डोळ्यसमोर ठेऊन कामाला सुरुवात केल्याचे समजते. (हेही वाचा, Aurangabad Municipal Corporation Election: औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 'बिहार पॅटर्न'? निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष)

औरंगाबाद महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल (एकूण जागा - 113)

  • शिवसेना - 29
  • एमआयएम - 25
  • भाजप - 22
  • काँग्रेस - 8
  • राष्ट्रवादी - 4
  • इतर - 24

शिवसेना भाजप सामना

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत या वेळी शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला तर तो मोठा रंजक असणार आहे. कारण, औरंगाबादमध्ये 'खाण की बाण' असा प्रचार गेली अनेक वर्षे प्रत्येक निवडणुकीत केला जातो. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी. त्यामळे दोन्ही पक्षांचा भर हा हिंदुत्त्ववादी राजकारणावर. त्यात शिवसेनेचा सर्वात मोठा भर हा आक्रमक हिंदुत्त्वावर आहे. परंतू, या वेळी शिवसेना महाविकासआघाडी निमित्ताने 'धर्मनिरपेक्ष' असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. त्यामुळे शिवसेना आपला आक्रमक हिंदुत्त्ववादी बाणा कायम ठेवणार की प्रचाराचे मुद्देच बदलणार याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला युतीचा म्हणून असा एक खास मदतार गेल्या काही वर्षांमध्ये तयार झाला आहे. हा मतदार यंदा कोणाच्या बाजूने कौल देणार यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. यात भाजपला एकाकी सामना लढावा लागला तर भाजप कोणते मुद्दे प्रचारात आणणार यावरही बरेच अवलंबून आहे. कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजप स्थानिक निवडणुकांमध्येही राष्ट्रीय मुद्द्यांचा आधार घेऊन लढलेला पाहायला मिळाले आहे.

महाविकासआघाडी आणि लिटमस टेस्ट

विधानसभा निवडणूक 2019 नंतर राज्यात महाविकास आघाडी उदयास आली. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर यायला आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये कोरोना संकट यायला एकच गाठ पडली. त्यामुळे दरम्यानच्या काळात काही निवडणुका झाल्या असल्या तरी, महावकासआघाडी हा प्रयोग जनतेला रुचला आहे किंवा नाही याबाबत अद्याप ठोस असे जनमत समोर आले नाही. औरंगाबाद, कोल्हापूर आणि राज्यातील इतर महापालिका निवडणुकांमध्ये जनमतातून या प्रयोगाची पोचपावती मिळणार आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणूक ही एक प्रकारची लिटमस टेस्ट ठरु शकते.