मुंबई, ठाणे लगत असलेला पालघर (Palghar) जिल्हा गुरुवारी (25 जुलै 2019) रात्री भूकंपाच्या मध्यम ते सौम्य धक्क्यांनी हादरला. या परिसरात भूकंपाचे एकूण चार धक्के बसले. यात पहिले दोन धक्के 3.6 रिश्टर स्केल (Richter Scale) इतक्या तीव्रतेचे तर उर्वरीत दोन धक्के हे अनुक्रमे 2.8 आणि 2.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यात घर अंगावर कोसळल्याने एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पालघर परिसरात भूकंपाचे धक्के वारंवार बसत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक भूकंपाच्या दहशतीत वावरत आहेत. या परिसरात भूकंप (Earthquake) वारंवार घडण्याचे कारण काय? याबाबत तज्ज्ञ मंडळी अभ्यास करत आहेत
पालघरमध्ये भूकंपाचे धक्के बसण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी भूकंपाचे सौम्य ते मध्यम स्वरुपाचे धक्के बसले आहेत. अलिकडील काही वर्षांचा इतिहास पाहता पालघरमध्ये सन 2018 नंतर भूकंपाचे धक्के बसण्याच्या घटना वाढल्या आहेत. अलिकडील काळात नोव्हेंबर 2018 मध्ये पालघर जिल्ह्यात भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर 2019 मध्ये भूकंपाचे धक्के बसण्याच्या घटना वाढल्या.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिक घरातून तातडीने बाहेर पडले. तर काहींनी सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. वृद्ध माणसे आणि काही घरातील स्त्रि-पूरुष आणि लहान मुले भेदरुन गेली. वेळ रात्रीची असल्याने या भीतीत अधिकच वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. (हेही वाचा, Palghar Earthquake Tremors: सकाळपासून पालघर 5 वेळा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण)
एएनआय ट्विट
An earthquake with a magnitude of 3.6 on the Richter Scale hit Palghar of Maharashtra at 1:15 AM today.
— ANI (@ANI) July 25, 2019
दरम्यान, सध्या राज्यभरात पावसाचे वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस हलका, मध्यम ते मुसळधार अशा स्थितीत पडत आहेत. तर काही भागात पाऊ अगदीच अत्यल्प आहे. पावसाळ्याच्या दिवसात दुष्काळाचे सावट दिसावे अशी विचित्र नैसर्गिक स्थिती असतानाच पालघरमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत. म्हणजे एका वेळी भरपूर पाऊस दुसऱ्या ठिकाणी दुष्काळसदृश्य स्थिती तर, तिसऱ्या बाजूला भूकंपाचे धक्के. एकाच वेळी अशा घटना घडणे म्हणजे हे पर्यावरण बदलाचे संकेत आहेत. मानवाने प्रगती आणि विकास या नावाखाली निसर्गावर जे अत्याचार सुरु केले आहेत त्यामुळेच अशा घटना घडत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी म्हटले आहे.