Palghar Earthquake Tremors: आज महाराष्ट्रामधील पालघर (Palghar), तलासरी (Talasari), डहाणू (Dahanu) या भागामध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के (Earthquake Tremors) बसले आहेत. आज सकाळी 3 ते 3.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के या भागामध्ये जाणावले. काही महिन्याभरापासून लागोपाठ हा भूकंपाच्या धक्क्यांचा सिलसिला सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आज सकाळी 6.58 मिनिटांनी, 10.03 मिनिटांनी आणि 10.29 मिनिटांनी पालघर भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. या भूकंपाची तीव्रता 3 ते 3.5 असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुपारी 2.10 मिनिटांनी चौथा धक्का बसला. तर चारच्या सुमारास पाचवा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
पालघरला सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा व्हीडिओ
#Palghar #earthquake #CCTV @News18India @raydeep @Shehl @ravipratapdubey @k_navjyot pic.twitter.com/xI3m2oWdDk
— Vivek Gupta News18 (@imvivekgupta) February 1, 2019
Earthquake of Magnitude:4.1, Occurred on:01-02-2019, 14:06:24 IST, Lat:19.9 N & Long: 72.8 E, Depth: 05 Km, Region:Distt. Palghar, Maharashtra pic.twitter.com/VKP0Rj9zG6
— India Met. Dept. (@Indiametdept) February 1, 2019
Earthquake of Magnitude:3.6, Occurred on:01-02-2019, 15:53:54 IST, Lat:19.9 N & Long: 72.8 E, Depth: 5 Km, Region:Distt. Palghar, Maharashtra pic.twitter.com/trlb917x4G
— India Met. Dept. (@Indiametdept) February 1, 2019
मागील काही दिवसांपूर्वी देखील अशाप्रकारे वारंवार पालघर,डहाणू भाग भूकंपाच्या धक्क्याने हादरत होता. काही पालघरवासीयांना यानंतर स्थालांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.