अकोला (Akola) जिल्ह्यातील पातूर वन विभाग (Partur Forest Department) परिक्षेत्रात बकरीच्या दुधावर बिबट्याच्या बछड्यांना (Leopard Cubs) आपली गुजराण करावी लागत आहे. या बछड्यांचे हस्तांतरण गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्प अधिकाऱ्यांकडे नुकतेच करण्यात आले. पातूर वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक वि. ग. माने यांनी दिलेल्या माहतीनुसार, एका बिबट मादीने चार बछड्यांना जन्म दिला. जन्म दिल्यावर ती त्यांना सोडून गेली. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवस वाट पाहिली. मात्र, चार दिवस उलटून गेले तरी ती परतलीच नाही. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बकरीचे दूध पाजून या बछड्यांचे संगोपन केले. दरम्यान, 15 दिवस संगोपन केल्यावर हे चारही बछडे (Leopard Cubs) गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकाकडे हस्तांतरित करण्यात आले. चारपैकी दोन बछडे नर तर दोन मादी आहेत.
सविस्तर माहिती अशी की, पातूर येथील मोरना नदी पात्रात बिबट्याचे तीन पछडे 30 जून 2020 या दिवशी नागरिकांना आढळून आले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीही (1 जुलै 2020) आणखी एक बछडा त्याच परिसरात सापडला. नागरिकांनी खानापूर येथील पातूर वन परिक्षेत्र भाग 2 मधील अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. हे बछडे साधारण 13 ते 15 दिवसांचे असावेत, असे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या बछड्यांची आई (बिबट मादी) आपल्या पिल्लांसाठी परत येईल यासाठी वाट पाहिली. पण, आई परत आलीच नाही. (हेही वाचा, मुंबई: ठाणे शहरातील फुलपाखरु उद्यानात बिबट्या; मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांची उडाली घाबरगुंडी)
दरम्यान, इतर जंगली, रानटी श्वापदांपासून पिल्लांना धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी ती पिल्ल जंगलातच पण थोडं सुरक्षित स्थळी आणून ठेवली. इतके करुनही बछड्यांची आई काही परत आलीच नाही. मग संबंधित परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरे लावून या बछड्यांच्या आईचा शोध घेण्यात आला. काही दिवस वाट पूहनही बछड्यांच्या आईचा शोध लागू शकला नाही. अखेर या बछड्यांना गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकाकडे हस्तांतरित करण्यात आले.
दरम्यानच्या काळात बछड्यांची काळजी घेण्यासाठी वन्यजीव विभागाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एका पथकाच्या देखरेकेखाली या बछड्यांची काळजी घेतली जाऊ लागली. या बछड्यांना बकरीचे दूध देण्यात आले. दिवसातून 3 वेळा आणि 60 टक्के दूध 40 टक्के पाणी या प्रमाणात दूध घेऊन ते उकळून आणि गाळून थंड करुन बछड्यांना दिले गेले. बछड्यांना हाताळण्यासाठी प्लास्टीकच्या बास्केटचा वापर करणयात आला.
प्रश्न होता या बछड्यांच्या संगोपनाचा. मग वन्यजीव विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली या चौघांची देखभाल सुरु झाली. त्यांना बकरीचे दूध देण्यात येत होतं. दिवसातून तीन वेळा. ६० टक्के दूध आणि ४० टक्के पाणी या प्रमाणात. दूध आधी उकळून घेऊन नंतर गार करुन पाजले जात होते. प्लास्टीकच्या बास्केटचा वापर त्यांच्या हाताळणीसाठी करण्यात आला.