मुंबई: ठाणे शहरातील फुलपाखरु उद्यानात बिबट्या; मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांची उडाली घाबरगुंडी
Leopard | Representational image (Photo credits: Wikimedia Commons)

काही महिन्यांपूर्वी ठाणेच्या कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता आज पुन्हा ठाण्यात मानपाडा परिसरात वन विभागाच्या फुलपाखरु उद्यानात (Phulpakharu Garden)आज (26 जून) सकाळी बिबट्याचं दर्शन झालं आहे. मात्र काही वेळातच बिबट्या (Leopard) बाहेर गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

आजकाल शहरांमध्ये वाढत चाललेल्या क्रॉंकिटीकरणामुळे मानवी हद्दीमध्ये प्राण्यांचा वावर वाढला आहे. शहरी भागात बिबट्या दिसण्याचं प्रमाण वाढलं आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या काहींना मानपाड्याच्या उद्यानात बिबट्या दिसला. बिबट्या पाहून काहींनी आरडाओरडा केला. लोकांची गर्दी पाहून बिबट्याही काही वेळातच तेथून पळाला. मुंबईतही नगरी वस्तीमध्येही अनेकदा बिबट्या पहायला मिळाला होता. मुंबई: मरोळ येथील Woodland Crest सोसायटीत बिबट्या शिरल्याने खळबळ (Watch Video)

स्थानिकांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी बचाव पथक बोलावले होते. मात्र ते येण्यापूर्वीच बिबट्या तेथून निघून गेला होता.