
भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट सोबत येण्याची ऑफर दिली. एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आमच्यासोबत (भाजप) यावे असे अवाहनच अजित पवार यांना केले होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना विचारले. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, 'कोणी काय बोलायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. सध्या आमचं महाविकासआघाडीत बरं चाललंय. चालूद्यात'.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांना दिलेल्या ऑफरवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. प्रसारमाध्यमांनीही त्याला फारशी हवा दिली नसली तरी काही प्रमाणात का होईना, त्याच्या बातम्या जरुर केल्या होत्या. त्यामुळे सामान्य नागरिकही भाजपकडून खरोखरच पुन्हा एकदा पाहटेच्या शपतविधीची तयारी चालू आहे का? अशा संशयीतपणे चर्चा करु लागला होता. प्रत्यक्षात तसे काही घडताना मात्र काहीच दिसत नव्हते. त्यात अजित पवार यांनी स्पष्टच सांगितल्याने विखे पाटल्यांच्या वक्त्यव्याने न उडालेली धूळ आपोआपच खाली बसली आहे. (हेही वाचा, Supriya Sule: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान - सुप्रिया सुळे)
देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, यावर आपल्याला काहीच बोलायचे नाही. पंतप्रधान आले कार्यक्रम छान झाला इतकेच. पंतप्रधान प्रथमच देहूला आले होते, असेही अजित पवार म्हणाले.
व्हिडिओ
दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी नुकतीच बारामती येथे उपस्थिती लावली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास अजित पवारही उपस्थित होते. याशिवाय अदानींच्या वाहनाचे सारथ्य रोहित पवार यांनी केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगळ्या चर्चांना उधान आले आहे.