
केवळ थंडीच नव्हे तर आता उन्हाळ्यातही स्वाइन फ्लू (Swine Flu) हातपाय पसररतो आहे. त्याचा फटका नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur), पुणे (Pune) आणि अहमदनगर (Ahmednagar) शहराहस उर्वरीत महाराष्ट्रातील अनेक शहर आणि जिल्ह्यांनाही बसला आहे. प्राप्त माहितीनुसार १ जानेवारी २०१९ पासून ते १० एप्रिलपर्यंत राज्यात तब्बल 94 रुग्णांनी स्वाइन फ्लू या आजारामुळे प्राण गमावले आहेत. स्वाइन फ्लू विषाणू प्रसारासाठी थंड वातावरण पोषक असते. त्यामुळे थंडीच्या महिन्यात या रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो, असे आजवरचे निरीक्षण होते. मात्र, अलिकडील काळात उन्हाळ्यातही स्वाइन फ्लू विषाणूची लागण होऊन रुग्ण दगावण्याची संख्या वाढल्याचे पाहता महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने तळ ठोकल्याचे चित्र आहे.
लोकसत्ता डॉट कॉमने आपल्या वृत्तात दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०१९ ते १० एप्रिल २०१९ या काळात राज्यात एक हजार दोनशे छत्तीस रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे आढळले. त्यातील 45 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यास डॉक्टरांना यश आले आहे. तर, 247 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Swine Flu ने देशभरात गाठला 6000 आकडा, राजस्थान मध्ये 100 जणांचा मृत्यू)
स्वाइन फ्लू टाळण्यासाठी कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वाइन फ्लू विषाणूचा प्रसार थंड वातावरणात अधिक होतो. त्यामुळे थंडीच्या महिन्यात या आजाराचे रुग्ण वाढल्याचे पाहायाला मिळते. मात्र, अलीकडील काही काळात उन्हाळ्यातही स्वाइन फ्लू विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विषयक सल्ला देणारे जाणकार सांगतात. स्वाइन फ्लू विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकाने योग्य विश्रांती आणि आवश्यक तो वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.