स्वाईन फ्लू (Swine Flu) चे देशभरात प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. या आजाराचे जास्तकरुन लक्षण राजस्थान येथे आढळून आले आहे. त्यामुळे 2019 या गतवर्षात राजस्थान (Rajashtan) मध्ये स्वाईन फ्लूमुळे मृतांचा आकडा 100 वर जाऊन पोहचला आहे. तसेच एकाच दिवसात 100 रुग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे नोंद करण्यात आली आहे.
वाढत्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्वाईन फ्लू पसरत चालल्यामुळे राज्यातील सरकारने याबद्दल जागृकता अभियान सुरु केले आहे. देशभरातील H1NI1 वायरसमुळे एकुण 70 टक्कांच्या स्वाईन फ्लूची नोंद फक्त राजस्थान येथे झाली आहे.
संपूर्ण देशातील स्वाईन फ्लूचा आकडा 6,000 वर जाऊन पोहचला आहे. तर राजस्थानमध्ये हा आकडा 2,706 गाठला आहे. या आजारपणामुळे पूर्ण देशातील एकुण 255 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 98 मृत्यूंची नोंद राजस्थान येथून करण्यात आली आहे. पीटीआय वृत्तवाहिनीनुसार या मृत लोकांच्या संख्येचा आकडा सांगण्यात आला आहे.
राजस्थान नंतर गुजरात हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. युनियन हेल्थ मिनिस्ट्री यांच्या नुसार, आतापर्यंत 1,187 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर स्वाईन फ्लूमुळे 54 लोकांचा मृत्यू गुजरातमध्ये झाला आहे. तसेच पंजाब येथे 30 जणांचा मृत्यू झाला असून 301 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.