7 Important Decision of Maharashtra Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक (Cabinet Meeting) आज, मंगळवारी पार पडली. राज्यातील दुष्काळासाठी (Drought) उपयायोजना करण्यासोबत इतर अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीमधील सर्वात महत्वाचा निणर्य ठरला तो कृत्रिम पाऊस पडण्याचा निर्णय. याशिवाय मध उद्यागाला चालना, ट्रॉमा केअरसाठी पदांची भरती, विद्युत शुल्क माफ असे इतर महत्वाचे निर्णय घेतले गेले. चला पाहूया आजच्या कॅबिनेटच्या बैठकीतील सात महत्त्वाचे निर्णय.
- कृत्रीम पाऊस – राज्यावर दुष्काळाचे फार मोठे सावट आहे. सरकारने अनेक उपाययोजना करून जनतेला दिलासा मिळाला नाही. अखेर पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिम पाऊस पडण्याचा निर्णय घेतला गेला.
- विद्युत शुल्क माफ - राज्यातील विदर्भ, मराठवाडा क्षेत्रातील उद्योग घटकांना विद्युत शुल्क माफीची सवलत 2013 ते 2019 या कालावधीसाठी देण्यात आली होती. आता यामध्ये पाच वर्षांसाठी वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली.
- मध केंद्र योजना - राज्यात मध उद्योगाला चालना देण्यासाठी मध केंद्र योजना राबवली जाणार आहे. यामुळे आजपर्यंत फक्त जोडधंदा म्हणून पाहिल्या गेलेल्या मध व्यवसायाचा विकास होऊन मुख्य व्यवसाय म्हणून त्याकडे पहिले जाईल.
- वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखा – आधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखा पुन्हा वन विभागाकडे सोपवण्यात येणार आहेत. सेवाज्येष्ठता, पदोन्नती आदींबाबतच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
- मधुकर सहकारी साखर कारखाना थकहमी- जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पूर्व हंगामी अल्प मुदत कर्ज घेण्यासाठी 7 कोटी रुपयांची शासन थकहमी देण्यास मान्यता.
- बारामती क्रीडांगनाच्या आरक्षणात बदल – बारामती येथील एका भूखंडावर विकास योजने अंतर्गत क्रीडांगण उभे करण्यास आरक्षण देण्यात आले होते. ते आता रद्द करून त्याठिकाणी आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यात येणार असल्याच्या मंजुरीला मान्यता देण्यात आली.
- ट्रॉमा केअर सेंटरसाठी पदनिर्मिती – राष्ट्रीय महामार्गावर घडणाऱ्या अपघातामध्ये जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणून पुणे आणि कोल्हापूर येथे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केले गेले आहे. यासाठी 92 पदांच्या निर्मितीच्या मंजुरीला मान्यता.