Mumbai: मुंबई शहर उपनगरात वेगवेगळ्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai: मुंबईत (Mumbai) रविवारी तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातात (Accident) तिघांचा मृत्यू झाला. मुंबईतील विक्रोळी, खार आणि पवई भागात हे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खार येथील पहिल्या घटनेत, मुंबईतील खार परिसरातील नीलम फूडलँड जंक्शन येथे भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार (27) तरुणाचा मृत्यू झाला. वीरेंद्र सिंग असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रमिला खुंबचंदानी नावाच्या आरोपीला खार पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग), आणि 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा नोंदवून अटक केली. वीरेंद्रला जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या एका घटनेत, मुंबईतील विक्रोळी परिसरात एका मिनी ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विक्रोळी पोलिसांनी बळीराम छोटूलाल यादवविरुद्ध भादंविच्या कलम 279, 304 अ आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (हेही वाचा -Mumbai Accident: वडाळा येथील ईस्टर्न फ्रीवेवर चार वाहनांची एकमेकांना धडक, अपघातामुळे वाहतुक सेवा विस्कळीत (Watch Video))

याशिवाय, तिसऱ्या घटनेत, मुंबईतील पवई जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर डंपर ट्रकला दुचाकीची धडक बसली. या अपघातात अतुल खरोसे असे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पवई पोलिसांनी डंपर ट्रकचा चालक रमजान नदाफ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (हेही वाचा- भरधाव कारने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; Mumbai येथील घटना)

याआधी रविवारी मध्य मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरने चालविलेल्या वेगवान कारने एका वृद्ध महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. जुबैदा शेख असे मृत महिलेचे नाव होते. तिला मधुमेहाचा त्रास होता. गेल्या दोन आठवड्यांपासून तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला आठवड्याभरापूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.