Mumbai Accident: वडाळा येथील ईस्टर्न फ्रीवेवर चार वाहनांची एकमेकांना धडक, अपघातामुळे वाहतुक सेवा विस्कळीत  (Watch Video)
Wadala Accident PC TWITTER

Mumbai Accident: मुंबईतील वडाळा परिसरात पहाटे चार वाजता अपघात झाला. या अपघातामुळे ईस्टर्न फ्रीवेवर वाहतुक सेवा विस्कळीत झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एका X च्या वापरकर्त्याने त्याच्या अकाऊंटवर अपघात झाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अपघातामध्ये ४ वाहने एकमेकांना आदळली आहेत. अपघातात चार कारचे भरपूर नुकसान झाले आहे. रस्त्यावर तेळ गळती झाले आहे त्यामुळे रस्त्यावर वाहतुक सेवा संथ झाली. (हेही वाचा- भरधाव कारने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; Mumbai येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, ईस्टर्न फ्रीवेच्या दक्षिनेकडील लेनच्या उजव्या बाजूला चार कार एकमेकांना धडकले आहेत. हा अपघात कशा झाला हे अद्याप समोर आले नाही. या अपघातामुळे वडाळा येथील रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली आहे. अपघातामुळे आणि रस्त्यावर झालेल्या तेल गळतीमुळे इतर वाहने संथ गतीने जाताना दिसत आहे. हा अपघात कशा झाला याचा पोलिस शोध घेत आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु चार गाड्यांचे नुकसान झाले आहे.

मुंबई वाहतुक पोलिसांनी X च्या अधिकृत अकाऊंटवरून याबाबत अपडेट दिले आहे. रस्त्याच्या अपघातामुळे आणि तेल गळतीमुळे वडाळा फ्रीवे पोल क्रमांक १०४ दक्षिणेकडे वाहतुक संथ झाले आहे'' असे मुंबई वाहतुक पोलिसांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.