Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलच्या आवारात एका वेगवान कारने (Speeding Car) एका ज्येष्ठ नागरिक ( Senior Citizen) महिलेला धडक दिली. ज्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री (24 मे) उशीरा घडली. एका पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी रात्री सांगितले. महिलेची ओळख अजून पटलेली नाही. सायन हॉस्पिटल (Sion Hospital In Mumbai) परिसरात या महिलेवर हत्या करण्याच्या उद्देशाने हल्ला झाला असावा, असा पोलिसांना सुरुवातीला संशय होता. मात्र, नंतर हे प्रकरण 'हिट अँड रन'चे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सायन पोलीस अधिक तपास करत आहेत.

महिला रक्ताच्या थारळ्यात

झोन 4 चे डीसीपी प्रशांत कदम यांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, सायन परिसरात एक ज्येष्ठ नागरिक महिला गंभीर जखमी आवस्थेत रस्त्यावर पडली आहे. आम्ही जाऊन पाहानी केली तर महिला रक्ताच्या थारळ्यात पडली होती. तिचे डोके आणि शरीरावर जखमा होत्या. तिच्यावर हत्येच्या हेतून हल्ला झाला असावा, आसा आम्हाला संशय होता. मात्र, आम्ही केलेल्या तपासात आढळून आले की, महिलेवर हल्ला नव्हे तर तिचा अपघात झाला आहे. एका भरधाव कारने तिला उडवले आहे. आम्ही महिलेला तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Mazgaon Motorcycle Accident: अल्पवयीन मुलाकडून दुचाकीची धडक, 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मुंबईतील माझगाव परिसरातील घटना, दुचाकीस्वार पोलिसांच्या ताब्यात)

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जखमी महिलेचा मुंबईतील सायन रुग्णालयात मृत्यू झाला. साईन हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश ढेरे यांच्या गाडीला हा अपघात झाला. मृत महिलेचा मुलगा शाहनवाज खान याच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम 304 (A), 388, 279, 203, 177 व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करून डॉ. राजेश ढेरे याला अटक केली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. रुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. (हेही वाचा - Pune Porsche Car Accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, वडीलांनाही पोलीस कोठडी)

व्हिडिओ

दरम्यान, रस्ता अपघात आणि 'हिट अँड रन' प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पुणे येथील प्रकरणाने तर समाजमन ढवळून टाकले आहे. पुण्यातील घटनेत एका बिल्डरपुत्रने आपल्या आलीशान पोर्श कारने कल्याणीनगर येथील रस्त्यावर दोघांना उडवले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई येथेही एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने दुचाकी चालवताना 30 वर्षीय तरुणाला धडक दिली. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला. नाशिक आणि नागपूर येथेही अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या. यामुळे रस्त्यावरुन बेदरकार वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजातून केली जात आहे.