Pune Car AccidentUpdates: पुणे पोर्श कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणी अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयास बाल न्याय मंडळाने जोरदार दणका दिला आहे. कोर्टाने या प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द (Minor Accused Bail Cancelled) केला आहे. त्यामुळे त्याला आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहातच राहावे लागणार आहे. आरोपीने मद्यपान केल्यावर नशेत असतानाही आपली आलीशान कार भरधाव वेगाने हाकताना रस्त्यावरुन जाणाऱ्या दोघांचा जीव घेतला. दरम्यान, आरोपी अल्पवयीन आहे की, सज्ञान याबाबत पोलीसच निर्यय घेतील असे बाल न्यायमंडळाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. याच प्रकरणा आरोपीच्या वडीलांनाही अटक झाली असून, त्यांना तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे.
अवघ्या 15 तासांमध्ये जामीन मंजूर झाल्याने समाजातून संताप व्यक्त
पुणे अपघात प्रकरणी दारुच्या नशेत भरधाव वेगाने वाहन हाकून दोघांच्या मृत्यूस कारण ठरलेला असतानाही बाल न्याय मंडळाने आरोपीस अवघ्या 15 तासांमध्ये जामीन मंजूर केला. न्यायमंडळाच्या निर्णयावर जनमानसातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, सोशल मीडियातून संतापही व्यक्त झाला. यंत्रणेवर नागरिकांतून या प्रकरणाचा प्रचंड दबावही होता. दरम्यान, पोलिसांनी या गुन्हात आरोपीवर नव्याने कलम लावावं आणि त्याचा जामीनही रद्द व्हावा अशी मागणी होत होती. दरम्यान, बऱ्याच टीका टिप्पणी नंतर बाल न्यायमंडळाने आरोपीचा जामीन रद्द केला आहे. (हेही वाचा, Pune Hit and Run Case: पुणे अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी; मार्चपासून विनाक्रमांक धावत होती गाडी)
पुणे पोलिसांकडून जोरदार युक्तीवाद
पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस कोर्टासमोर बुधवारी (22 मे) सकळी हजर केले. या वेळी बचाव पक्षाच्या वकीलांनी आरोपीला वाचविण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. आरोपीच्या वकीलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचेही सांगितले. मात्र, पोलिसांनी घटना घडली तेव्हा आरोपीने मद्यसेवन केले होते आणि तो नशेच्या अंमलाखाली होता, असे सांगितले. शिवाय कोझी किचन हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलाने भरलेलं 48 हजार रुपयांचे बीलही कोर्टाला सादर केले. पोलिसांनी कोर्टाकडे मागणी केली की, आरोपीने केलेले कृत्य अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे त्याच्यावर खटला चालविण्याची परवानगी देण्यात यावी. (हेही वाचा - Pune Porsche Car Accident: पोर्शे कारच्या अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांना अटक, संभाजीनगर येथून घेतेले ताब्यात)
एक्स पोस्ट
Pune Car Accident Case | The Juvenile Justice Board remanded the minor accused to a Rehabilitation/Observation home till 5th June: Pune Police Officials
— ANI (@ANI) May 22, 2024
वडिलांना कोठडी
दरम्यान, पोलिसांनी तपासानंतर अल्पवयीन मुलावर 185 कलमाच्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला. ज्यामध्ये मद्यधुंत अवस्थेत नशेच्या अंमलाखाली वाहन हाकल्याचा आरोप आहे. शिवाय त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगत कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. मुलाला कोर्टासमोर हजर केले असता त्याचा जामीन रद्द करण्यात आला. दरम्यान, याच प्रकरणात आरोपी मुलाच्या वडीलांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचे जनमानसात प्रचंड पडसाद उमटत आहेत. दरम्यान, पोलीस तपासात पुढे काय घडते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.