Mazgaon Motorcycle Accident: अल्पवयीन मुलाकडून दुचाकीची धडक, 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मुंबईतील माझगाव परिसरातील घटना, दुचाकीस्वार पोलिसांच्या ताब्यात
Motorcycle Accident | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

Mumbai Motorcycle Accident: मुंबई (Mumbai) येथील माझगाव (Mazgaon) परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन मुलाने चालविलेल्या मोटारसायकलने धडक दिल्याने 32 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू (Mumbai Minor Kills 32-Year-Old Man in Mazgaon) झाला. इरफान नवाब अली शेख असे पीडित तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाला रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वची मृत घोषीत केले. या अपघातातील (Mazgaon Motorcycle Accident) दुचाकीस्वारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे येथे अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे चालवलेल्या आलीशान पोर्श कारने चिरडून दोघांना मारल्याची घटना नुकतीच घडली आहे. समाजात त्याचे गंभीर पडसाद उमटत असतानाच मुंबई येथील घटना घडली आहे. ज्यामुळे अल्पवयीनांच्या हातात दिली जाणारी वाहने हा मुद्दा चिंतेचा विषय ठरत आहे.

घटनेचा तपशील

मुंबई पोलीस माहिती देताना म्हणाले, पीडिताला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. जिथे नंतर त्याचा मृत्यू झाला. अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा, Pune Porsche Car Accident: 1 तास TV, 2 तास खेळण्याची वेळ; 'असा' असणार पुण्यातील कार अपघातातील अल्पवयीन मुलांचा बालगृहातील दिनक्रम)

कायदेशीर कारवाई

पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनाही ताब्यात घेतले आहे आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 304(2) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे. (हेही वाचा - Pune Porsche Car Accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, वडीलांनाही पोलीस कोठडी)

पुणे येथेही अल्पवयीन मुलामुळे दोघांचा मृत्यू

पुणे येथील अल्पवयीन मुलांचा समावेश असलेली पोर्श कार अपघाताची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. त्यापाठोपाठ अवघ्या काहीच दिवसात माजगाव येथील घटना घडली आहे. 19 मे रोजी मध्य प्रदेशातील अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या दोन तरुण आयटी व्यावसायिकांचा पुण्यातील कल्याणीनगर येथे एका 17 वर्षीय तरुणाने त्यांच्या मोटारसायकलला त्यांच्या आलिशान कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला.

एक्स पोस्ट

पुणे प्रकरणाची कायदेशीर कार्यवाही

पुणे खटल्यातील अल्पवयीन आरोपीचे प्रतिनिधित्व करणारे वकील प्रशांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, किशोरवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवायचा की नाही हे बाल न्याय मंडळ ठरवेल. पाटील यांनी स्पष्ट केले, "ज्युवेनाइल जस्टिस ऍक्टमध्ये कायद्यातील संघर्षातील मूल (CCL) अल्पवयीन मानले जावे की नाही हे तपासण्यासाठी प्रक्रियांची रूपरेषा सांगितली आहे," पाटील यांनी स्पष्ट केले. "या प्रक्रियेला साधारणतः 90 दिवस लागतात." पाटील पुढे म्हणाले की, या प्रक्रियेदरम्यान व्यक्तीला पुनर्वसनात राहण्याची गरज नाही. बाल न्याय मंडळ नियमित अहवाल आणि तक्रारींद्वारे मूल्यांकनांचे निरीक्षण करते, सुमारे 90 दिवसांनंतर निर्णय घेते की अल्पवयीन मुलाशी प्रौढ म्हणून वागावे की नाही.