Coronavirus Update: मुंंबई, पुणे सहित महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आकडेवारी
Coronavirus (Photo Credits: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोनाचे 15,765 नवे रुग्ण आढळुन आले आहेत, परिणामी राज्यातील कोरोनाबाधितांंची एकुण संंख्या 8 लाखाच्या पार गेला आहे. राज्यात आजवर 8,08,306 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. यातील 24 हजार 903 रुग्णांंचा कोरोनाने बळी (Coronavirus Deaths)  घेतला आहे. साहजिकच हे आकडे जरी भीतीजनक असले तरी राज्यात मुळ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांंची संख्या (COVID 19 Active Cases) ही अवघी 1,98,523 इतकीच आहे. तर दुसरीकडे रिकव्हरी झालेल्या रुग्णांंची संंख्या (Coronavirus Recovery Rate)  5,84,537 इतकी आहे.

राज्यात सध्या कोरोनाचा रिकव्हरी रेट 72.32% आहे तर मृत्युदर अवघा 3.08% इतका आहे. राज्यात मुंंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) मध्ये कोरोना रुग्णांंच्या संख्या सतत कमी अधिक होत आहे. सोमवार पर्यंत पुण्यात मुंंबई हुन अधिक रुग्ण होते तर आता पुन्हा या यादीत मुंंबई पुढे आहे. या दोन मुख्य शहरांंसोबतच अन्य जिल्हा व मनपा विभागात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेला तक्ता तपासुन पाहा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी (2 सप्टेंबर)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई मनपा १४६९४७ ७६९३
ठाणे १९८९० ५२५
ठाणे मनपा २६९८० ९७२
नवी मुंबई मनपा २९०७२ ६४७
कल्याण डोंबिवली मनपा ३२३७९ ६५९
उल्हासनगर मनपा ७९५१ २९०
भिवंडी निजामपूर मनपा ४५०९ ३१४
मीरा भाईंदर १३०६१ ४३३
पालघर ८४३० १४५
१० वसई विरार मनपा १७४६६ ४५१
११ रायगड १७७७७ ५०३
१२ पनवेल मनपा १३०२३ २९४
ठाणे मंडळ एकूण ३३७४८५ १२९२६
नाशिक ९७५० २५२
नाशिक मनपा २८०५० ५१८
मालेगाव मनपा २६२९ ११५
अहमदनगर ११९९९ १७२
अहमदनगर मनपा ९०९२ १२६
धुळे ४१०८ ११३
धुळे मनपा ३८२० १०४
जळगाव २१६९३ ७००
जळगाव मनपा ६४०५ १६९
१० नंदुरबार २७९६ ७४
नाशिक मंडळ एकूण १००३४२ २३४३
पुणे २६९६१ ७३६
पुणे मनपा १०२८४९ २५७९
पिंप्री-चिंचवड मनपा ४८७८८ ८०६
सोलापूर १३१२९ ३५१
सोलापूर मनपा ६९०४ ४२७
सातारा १४७४३ ३५७
पुणे मंडळ एकुण २१३३७४ ५२५६
कोल्हापूर १५८७२ ४७९
कोल्हापूर मनपा ६८८४ १८३
सांगली ६३४५ १९०
सांगली मिरज कुपवाड मनपा ८०९७ २५५
सिंधुदुर्ग १३०८ २०
रत्नागिरी ४२८२ १५१
कोल्हापूर मंडळ एकुण ४२७८८ १२७८
औरंगाबाद ८१७३ १३४
औरंगाबाद मनप १५१२३ ५४०
जालना ४४४१ १३५
हिंगोली १५१५ ३६
परभणी १३३३ ४१
परभणी मनपा १४०५ ४५
औरंगाबाद मंडळ ७९३एकूण ३१९९० ९३१
लातूर ४७८३ १६५
लातूर मनपा ३४६२ ११०
उस्मानाबाद ६१८५ १६५
बीड ४८८३ १२६
नांदेड ४२८९ १२१
नांदेड मनपा ३२२१ १०७
लातूर मंडळ एकूण २६८२३ ७९४
अकोला १७५५ ६२
अकोला मनपा २२६० ९४
अमरावती १४४० ४१
अमवरावती मनपा ३८१७ ९५
यवतमाळ ३३७२ ७७
बुलढाणा ३५२५ ७४
वाशीम १८१४ ३०
अकोला मंडळ एकूण १७९८३ ४७३
नागपूर ७१२२ ९७
नागपूर मनपा २२४११ ६५५
वर्धा १०२६ १८
भंडारा ११७३ २२
गोंदिया १५६९ १८
चंद्रपूर १६०६ १०
चंद्रपूर मनपा १०२७
गडचिरोली ८३०
नागपूर मंडळ एकूण ३६७६४ ८३०
इतर राज्य ७५७ ७२
एकूण ८०८३०६ २४९०३

दरम्यान राज्यातील रुग्ण संंख्या नेहमीच 10-15 हजाराहुन अधिक रुग्णांंसह वाढत आहे, याचे कारण देताना झपाट्याने होणार्‍या कोरोना चाचण्यांंमुळे रुग्ण वाढत आहेत, किंंबहुना समोर येत आहेत असे सांंगितले जातेय, राज्यात आतापर्यंत 42 लाख 11 हजार 752 चाचण्या झाल्या आहेत ज्यातील 19.19ं% म्हणजेच 8,08,306 रुग्ण हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 13 लाख 27 हजार 579 व्यक्ती घरात तर 36 हजार 020 रुग्ण हे इंंस्टिट्युशनल क्वारंंटाईन मध्ये आहेत.