Nagpur: व्हेंटिलेटर न मिळाल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; आई-वडीलांनी 20 तास दिला अ‍ॅम्बु बॅगद्वारे कृत्रिम श्वास
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Nagpur: यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) रेफर केलेल्या 17 वर्षीय किडनीग्रस्त मुलीचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. व्हेंटिलेटर (Ventilator) न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडून हरगर्जीपणा झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. रुग्णाला गंभीर अवस्थेत नागपूरला पाठविण्यात आले. परंतु, तरीहा, मुलीला जीएमसीएचमध्ये 30 तासांपेक्षा जास्त वेळ व्हेंटिलेटरविना ठेवण्यात आले होते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सरकारी वैद्यकीय रुग्णालयात एका तरुण रुग्णाचा व्हेंटिलेटर सपोर्टशिवाय मृत्यू झाला, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत मुलीचे आई-वडिल अत्यंत गरीब कुटुंबातील असून ते रोजंदारीवर काम करतात. तिला उपचारासाठी जीएमसीएचमध्ये आणण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने डॉक्टरांनी तिला अम्बू बॅगवर ठेवलं होतं. अम्बू बॅग म्हणजे सामान्यत: श्वास घेत नसलेल्या किंवा पुरेसा श्वास न घेणार्‍या रुग्णांना श्वास देण्यासाठी हाताने वापरण्यात येणारे उपकरण आहे. डॉक्टरांनी हे उपकरण पालकांकडे सुपूर्द केले आणि त्यांच्या मुलीला जिवंत ठेवण्यासाठी ते ऑपरेट करण्यास सांगितले. (हेही वाचा - Farmer Suicide Attempt in Beed: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणावेळी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक प्रकार)

रुग्णांच्या नातेवाईकांना पालकांना अंबू बॅग चालवण्याचे प्रशिक्षण दिलेले नव्हते. तरीही त्यांनी त्यांच्या मुलीला 30 तास ऑक्सिजन पुरवला. रुग्णालयाचे डीन डॉ सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, “आमच्याकडे एकूण 221 व्हेंटिलेटर आहेत आणि त्यापैकी 191 योग्यरित्या कार्यरत आहेत. मुलीला वॉर्ड क्रमांक 48 मध्ये दाखल करण्यात आले होते. तिथले सर्व व्हेंटिलेटर गंभीर रुग्णांसाठी वापरले जात होते. शिवाय, रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि त्यामुळे तिला इतर वॉर्डात हलवणे शक्य नव्हते. आयसीयू बेड देखील व्यापले होते. त्यामुळे मुलीला तिथे हलवले गेले नाही.”

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत, GMCH डीनने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या वॉर्डातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, तेथे ठेवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये ऑक्सिजनचा दाब व्यवस्थित ठेवता येत नाही. केवळ आयसीयूमधील व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेने कार्यरत होते आणि मुलीला जीएमसीएचमध्ये आणले तेव्हा ते सर्व व्यापलेले होते.