ऑफिसमध्ये कामाजा व्याप जास्त असेल तर काही वेळानंतर कंटाळा येणे सहाजिक आहे. परंतु ऑफिसमध्ये लंच केल्यानंतर झोप येत असल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे काही जण झोप घालवण्यासाठी 3-4 कप चहा पिणे पसंत करतात. तरीही झोप काही जात नाही. एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली काहीजण ऑफिसात बसून बसून भरपूर प्रमाणात साखरेचे सेवेन करतात. शरीराला उर्जा मिळावी म्हणून एनर्जी ड्रिंक पितात खरे पण ते आरोग्यासाठी घातक ठरु शकते.तर कॅफेनचे अतिरिक्त सेवन केल्याने थकवा जाणवतो. तसेच कामात लक्ष सुद्धा लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला ऑफिसमध्ये लंच नंतर झोप येत असेल तर चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक पिण्यापेक्षा 'या' टिप्स जरुर वापरा. असे केल्यास तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप आणि थकवा सुद्धा दूर होईल.
-थोडावेळ गाणी ऐका
जर तुम्ही कप्युटरवर बसूनच काम करत असाल आणि दुपारी लंच नंतर झोप येत असेल तर थोडावेळ गाणी ऐका. असे केल्याने तुम्हाला झोप येण्यापासून दूर होण्यास मदत होईल. तसेच लंच केल्यानंतर 2-3 तासानंतर संध्याकाळच्या नाश्तासाठी सुद्धा थोडा वेळ ब्रेक घ्या.
-लिंबू पाणी प्या
तुम्हाला ऑफिसमध्ये बसून सारखी चहा पिण्याची सवय असेल तर त्यापासून दूर व्हा. त्याऐवजी लिंबू पाणी प्या. लिंबू पाणी शरिराला उर्जा देण्याचे काम करण्यासोबत ताण सुद्धा कमी करण्यास मदत होईल.
-थंड पाण्याने चेहरा धुवा
तुम्हाला ऑफिसमध्ये खुपच झोप येत असेल तर लगेच थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा. एका अभ्यासानुसार, थंड पाणी हे शरिरात असलेल्या रेटिक्युलर सिस्टिमला अॅक्टिव्हेट करते. त्यामुळे थकवा दूर होतो.(Health Tips: स्नायूंना आराम देण्यासाठी आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी हे '5' आयुर्वेदिक तेल ठरतील गुणकारी)
-हलका व्यायाम करा
तास् न तास तुम्ही कप्युटरच्या समोर बसून काम करत असाल तर तुमचे डोळे किंवा पाठ दुखण्यास सुरुवात होते. यामुळे काम करताना थोडा वेळ मध्ये ब्रेक घ्या. तसेच बसल्या जागी हलका व्यायाम करा जेणेकरुन तुमचा थकवा पळून जाईल.
त्यामुळे जर तुम्हाला कधी लंच नंतर झोप येत असेल तर वरील टिप्स नक्की वापरा. तसेच ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून काम करायचे असल्यास थोडा थोडा वेळाने ब्रेक घेत चाला जेणेकरुन तुम्हाला पाठ दुखण्याची समस्या येणार नाही.