
घड्याळ्याच्या काटावर चालणारे आपले धकाधकीचे जीवन, कुटूंबातील तंटे, रोजची महागाई यांसारख्या अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेला व्यक्तीला गरज आहे ती थोडी मन:शांतीची पण यासाठी अशा शांत जागा तरी किती राहिल्या आहेत मुंबईत. मात्र आपल्या शरीराला योग्य तो आराम न मिळाल्या कारणाने आपल्याला स्नायूंमध्ये वेदना निर्माण होणे, मानसिक थकवा जाणवणे यांसारखे आजार उद्भवतात. अशा वेळी काय करावे हे सुचत नाही. लहानपणी आपले डोके जड झाले असेल किंवा थकवा जाणवत असेल तर आपली डोक्याला खोबरेल तेल लावायची ज्याने आपल्या शरीराला आराम मिळायचा.
त्याचप्रमाणे तुमच्या शरीराला देखील योग्य तो आराम मिळण्यासाठी आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक तेलाने (Ayurvedic Oil) मसाज करु शकता. पुढील 5 आयुर्वेदिक तेलाने तुमच्या हाता-पायांना मसाज केल्यास तुम्हाला थोडे हलके वाटेल आणि मानसिक तणावही दूर होण्यास मदत होईल.
1. निलगिरीचे तेल
पुदीन्याच्या तेलाप्रमाणेच निलगीरीचे तेलसुद्धा मानसिक व शाररिक थकवा, वेदना, पेटके येणाऱ्या समस्यांपासून आराम देते. शरीरावर आलेली सूज कमी करून त्वचा निरोगी ठेवते. या तेलातील अँटीबॅक्टेरिअल गुणधर्मांमुळं त्वचा निरोगी राहते.
2. रोजमेरी ऑइल
या तेलाच्या मसाजद्वारे तणाव कमी होतो तसेच त्वचेतील स्नायूंना आराम मिळेल. पुर्वी रोजमेरी तेलाचा वापर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी केला जायचा. या तेलाचा फक्त सुवास घेतल्यानं लगेचच डोकेदुखी बंद होते. तसंच, सांधेदुखीसाठीही या तेलाचा वापर करता.
3. पुदीन्याचे तेल
पुदीनाचे तेलाच्या सुवासामुळं लगेचचं मेंदूला आराम मिळतो. हे तेल थकवा घालवण्याबरोबरच वेदना, पोटदुखी, मासिक पाळीचा त्रास, डोकेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्या दूर करून लगेच आरोम देते. Winter Health Tips: थंडीत अनेक आजारांवर मात करण्यासाठी 'सुंठ' ठरेल फायदेशीर; अशा पद्धतीने करा सेवन
4. लव्हेंडर तेल
लव्हेंडर तेलाची सुगंध मन शांत करते. यामुळं मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. सौम्य सुगंधाच्या या तेलात मन हलकं होण्याची क्षमता आहे. या तेलानं मसाज करण्यासाठी दोन चमचे एरंडेल तेलात दोन थेंब लव्हेंडर तेल टाका. या तेलानं पूर्ण बॉडि मसाज घ्या. मानसिक व शाररिक थकव्याबरोबरच त्वचा व मुरुमांची समस्यादेखील दूर होते.
5. कॅमोमाइल ऑइल
बाजारात दोन प्रकारचे कॅमोमाइल तेल उपलब्ध आहेत. रोमन कॅमोमाइल आणि जर्मन कॅमोमाइल असं दोन प्रकार उपलब्ध आहेत. दोन्ही तेलांचा वापर त्वचेवर लावण्यासाठी केला जातो. तसंच, थकवा घालवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीच्या वेळेस हे तेल वापरल्यास आराम पडतो.
तसे पाहायला गेलं तर तेल कोणत्याही सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखीवर जितके गुणकारी आहे तितकेच ते डोक्याला लावल्याने देखील शांतता मिळते. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक तेलाचा मसाज केल्याने देखील शरीरातील थकवा दूर होतो आणि थोडा आराम मिळतो.