Winter Health Tips: थंडीत अनेक आजारांवर मात करण्यासाठी 'सुंठ' ठरेल फायदेशीर; अशा पद्धतीने करा सेवन
Ginger Powder (Photo Credits: PIxaBay)

आपल्याला कधी खोकला लागला तर आपली आई किंवा आजी सूंठ (Ginger Powder) खायला देते. जेणेकरुन खोकला थांबतो आणि घशाला आराम मिळतो. यात गंमतीची बाब म्हणजे यावरुनच पुढे 'सुंठीवाचून खोकला गेला' अशी म्हण आली असावी. असो पण खरंच सुंठ ही केवळ खोकल्यावर नाही तर अनेक आजारांवर गुणकारी ठरते. ज्यात ताप, सांधेदुखी, छातीत कळ येणे यांसारख्या आजारांचा समावेश आहे. सुंठ ही सुकवलेल्या आल्याची पावडर असते त्यामुळे ज्यांना आलं खाणे आवडत नसेल ते सुंठ खाऊन आपला खोकला दूर करु शकतात.

सर्वसाधारणपणे खोकला लागला की आपण थोडसं सुंठ पावडर तोंडात घेतो. मात्र जर ही सुंठ पावडर खाली दिलेल्या विशेष पद्धतीने खाल्ली तर ती अनेक आजारांवर उपयुक्त ठरु शकते.

1) सुंठ आणि खडीसाखर एकत्र करून त्याचा पाक चाटल्याने खोकला कमी होतो.

2) अजीर्णाची समस्या असल्यास सुंठ ताकात उगाळून प्यावी.

3) घशात जळजळ आणि आंबट उलटी अशी आम्पपित्ताची लक्षणं असतील, तर सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखर समप्रमाण घेऊन खावं.

हेदेखील वाचा- Winter Health Tips: घसादुखी वर 'हे' झटपट घरगुती उपाय नक्की येतील कामी

4) सांध्याच्या ठिकाणी सूज आल्यास त्यावरही सुंठीचे सेवन फायदेशीर आहे.

5) छातीत कळ आल्यास फक्त सुंठीचं चाटण दिलं तरी बरं वाटतं.

6) सुंठ घातलेले पाणी उकळून प्यावं ताप कमी होतो.

7) सातत्याने ढेकर येत असेल तर त्यावर सुंठीचं चाटण खावं.

8) अर्धांगवायू असलेल्यांना सुंठ पूड, लसूण आणि तूप एकत्र करून घ्यावं.

9) सुंठ खाल्ल्याने खूप भूक लागते.

तसेच जर तुम्हाला डोकेदुखी, भोवळ येण्याची समस्या असेल तर सुंठ उगाळून त्याचा लेप कपाळाला लावावा. अशा पद्धतीने सुंठाचे सेवन केल्यास ते अनेक आजारांवर फायदेशीर ठरु शकते.