फास्ट फूड ( फोटो सौजन्य - फेसबुक)

फास्ट फूड म्हणजे चटपटीत आणि कमी वेळेत उपलब्ध होणारे पदार्थ. तर काही जण हे पदार्थ रोजच्या रोज खातात. मात्र या पदार्थांमधील विषारी घटक शरीरासाठी घातक ठरु शकतात हे माहिती आहे का? तर या 5 विषारी घटकांपासून फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणाऱ्यांनी जरा लांबच रहा.

किटकनाशक
हल्ली बाजारातील बहुतांश पदार्थांमध्ये किटकनाशकांचा वापर केला जातो. त्यातील घातक घटकांमुळे शारीरिक व्याधी निर्माण होते.म्हणूनच फळ किंवा भाज्या वापरण्याआधी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्यात. यामुळे त्याच्यावर फवारण्यात आलेली किटकनाशके पाण्यात वाहून जातात.

कृत्रिम रंग

बऱ्याचदा पदार्थ आकर्षक व ताजा दिसावा म्हणून त्यात कृत्रिम रंग वापरले जातात. पण असे पदार्थ शरीरात विष निर्माण करतात. या पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याचा धोका असतो.  यामुळे असे पदार्थ खरेदी करण्याआधी त्यात कोणते साहीत्य वापरले गेले हे तपासून पहावे.

ट्रान्स फॅट

हा घटक प्रामुख्याने डबेबंद पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. तर हायड्रोजिनेटेड ऑईल आणि पदार्थ दिर्घकाळ टिकावा म्हणून इतर घटक यामध्ये टाकले जातात. असे घटक असलेले पदार्थ दिर्घकाळ खाल्ल्याने डायबिटीज, हाय कॉलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची संभाव्यता असते.

मीठ

बाजारात पाकिटबंद पादार्थ विकले जातात. यात मीठाचा अतिवापर केल्याने ते चविष्ट लागत असले तरी आरोग्यास हानीकारक असतात. अशा पदार्थांमध्ये सोडीयमचा वापर केला जातो.ज्याच्यामुळे रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होतो. परिणामी हृदयाशी संबंधित व्याधी होतात.

झिरो कॅलरी शुगर

झिरो कॅलरी शुगर या गोंडस नावाखाली हल्ली बरेच पदार्थ विकले जातात. साखर न वापरता पदार्थातील गोडवा कायम राहावा म्हणून त्यात कृत्रिम साखर वापरली जाते. यालाच झिरो कॅलरी शुगर असे म्हणतात. पण यामध्ये सॅकरीन आणि एस्परटेम नावाचे घटक  असल्याने सांधेदुखी, पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवतात.