प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

हिवाळा (Winter), ख्रिसमस, इअर ऐंडिंग (Year Ending) म्हण्टलं की एकचं ट्रॅव्हल डेस्टीनेशन (Travel Destination) आठवतं, ते म्हणजे गोवा (Goa). गो गोवा (Go Goa) असं गाणं जर तुम्हीही सध्या गुणगुणत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. ख्रिसमस आणि न्यू इअरच्या (New Year) पार्श्वभुमिवर देशभरासह आंतराराष्ट्रीय पर्यटक (International Tourist) देखील गोव्यात मोठी गर्दी करतात. यासाठी गोव्यातील विविध पर्यटक स्थळ (Goa Tourist Destination), गोव्यातील बिचेस (Goa Beaches) स्वच्छ ठेवणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने गोवा सरकारकडून (Goa Government) विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. तरी या नव्या नियमांनुसार प्रशासनाकडून बिचवर बसून दारु पिण्यास आणि अन्न शिजवण्यास सख्त मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती गोवा पोलिसांकडून देण्यात आली आहे. गोव्यातील समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी हे नवे नियम लागू करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

दिवाळीपासूनचं (Diwali) गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या (Tourist In Goa) संख्येत मोठी वाढ झाली आहे. तरी दिवसेनदिवस ही संख्या अधिकाधीक वाढण्याची शक्यता आहे. कोरोना महामारी (Corona Pandemic) नंतर निर्बधांविना साजरा करता येणार हा पहिलाचं ख्रिसमस किंवा न्यू इयर असणार आहे. त्यामुळे स्वच्छेतच्या पार्श्वभुमिवर गोवा सरकारकडून (Goa Government) काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. (हे ही वाचा:- Mumbai-Mandwa Water Taxi: मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी आजपासून सुरू, आता अवघ्या 45 मिनिटांत होणार प्रवास)

 

सार्वजनिक ठिकाणी जेवण बनवणे, समुद्र किनाऱ्यांवर कचरा फेकणे, किनाऱ्यांवर वाहनं चालवणे यासह दारू पिण्यावरही गोवा सरकारने बंदी घातली आहे. अनधिकृत हातगाड्या आणि फेरीवाऱ्यांवरही गोवा सरकारने निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील वॉटर स्पोर्ट्सच्या तिकीट विक्रीवरही बंदी घातली आहे. अशा तिकीटांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहेत.