Savitribai Phule Birth Anniversary: घरातली बाई शिकली की सारं कुटुंब साक्षर होतं हे ओळखून सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी भारतामध्ये महिला आणि मुलींना शिक्षणासाठी शाळेचे दरवाजे खुले केले. आज 21 व्या शतकात अवघ्या एका क्लिकवर जगाच्या कोणत्याही टोकावरून शिक्षण मिळवणं सुकर झालं आहे. मात्र 19 व्या दशकात समाजाचा रोष, हीन वागणूक पत्करून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवलं.
- देशात सावित्रीबाई फुले यांची ओळख भारताची पहिली महिला शिक्षिका अशी आहे.
- सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती आणि ज्येष्ठ समाजसेवक ज्योतिबा फुले यांच्यासोबत समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी, सतीप्रथा, बालविवाह, विधवा विवाहांना मान्यता मिळवण्यासाठी,अस्पृश्यता यांच्याविरूद्ध लढा दिला.
- 3 जानेवरी1831 साली सातार्याच्या नायगाव या ठिकाणी सावित्रीबाईंचा जन्म झाला. अवघ्या 9 व्या वर्षी त्यांनी ज्योतिबांसोबत लग्न केले. सावित्रीबाईंना शिक्षणाची आवड होती मात्र घरातून विरोध असल्याने ज्योतिबांसोबत शेतीकाम करताना शिक्षण घेत होत्या.
- वडिलांना शेतामध्ये ज्योतिबा सावित्रीबाईंना शिक्षण देतात या गोष्टीचा जेव्हा पत्ता लागला तेव्हा त्यांनी समाजाच्या भीतीने ज्योतिबांना घराबाहेर काढलं. मात्र जिद्दी ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शाळेत पाठवले. समाजातून या प्रकाराला विरोध झाला असला तरीही सावित्रीबाईंनी जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण केले.
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सावित्रीबाईंनी समाजातील इतर महिला आणि मुलींना शिक्षणाचे धडे दिले. 1848 साली त्यांनी पुण्यात बालिका विद्यालयाची स्थापना केली.
- सुरूवातीला नऊ विद्यार्थींनी सुरू झालेली बालिका विद्यालय ही शाळा हळूहळू सार्यांसाठी खुली झाली. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या. इंग्रजी शिक्षणावरही सावित्रीबाईच्या अधिक जोर होता.
महाराष्ट्रासह भारतीय समजात जातीव्यवस्थेपासून शिक्षणापर्यंत अनेक गोष्टींमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यामध्ये सावित्रीबाईंचा मोलाचा वाटा आहे.