Why Sex Is Important: लॉकडाऊन (Lockdown) मध्ये ज्या मंडळींचे पार्टनर्स जवळ आहेत त्यांची सेक्स लाईफ (Sex Life) मागील चार महिन्यात सुधारली किंवा निदान बदलली तरी असणार, हो ना? पण ज्यांना घराबाहेर पडून पार्टनरकडे जाता येत नाहीये किंबहुना अशी मंडळी ज्यांना पार्टनर च नाहीये त्यांचं काय? अलीकडेच एका निरीक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार सेक्सची कमतरता ही शरीरावर दुष्परिणाम करणारी ठरू शकते असं सिद्ध झालंय. आजवर आपण सेक्स मुळे शरीरावर वाईट परिणाम होत असल्याचे ऐकले असेल पण आता हे सेक्स न करण्याचे कोणते वाईट परिणाम आहेत हे जाणून घेऊयात, यवत काही सोप्पे आणि सरळ उपाय सुद्धा आपण या लेखातून पाहणार आहोत. चला तर मग, लॉक डाऊन मुळे किंवा कोणत्याही कारणाने तुमच्या आयुष्यात आलेल्या Dry Spell चे परिणाम पाहुयात.
सेक्स न करण्याचे दुष्परिणाम
- काही अभ्यासकांच्या माहितीनुसार, खूप दिवस सेक्स न केल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. किंबहुना ज्यांना हा त्रास आहे त्यांच्यात हे एक कारण कॉमन आढळून आले आहे.
- रक्तदाब वाढल्यास त्याचा थेट परिणाम मानसिक ताणतणाव निर्माण करणे असा होऊ शकतो. म्हणजेच सेक्स न केल्याने एकंदरीत मानसिक दबाव वाढण्याची शक्यता असते.
-सेक्स मुळे कॅलरीज बर्न व्हायला मदत होते हे तर तुम्हाला माहीतच असेल, आता या सेक्स चा अभाव शरीरातील अतिरिक्त चरबी वाढण्यास कारण ठरू शकतो.
-पार्टनर असूनही सेक्स ची कमी असल्यास हे तुमच्या नात्यात दुरावा आणणारे सुद्धा एक कारण ठरू शकतो.
-फार काळासाठी सेक्स न करण्याने तुमच्या सेक्स ड्राइव्ह हळूहळू कमी होऊ शकतात, त्यामुळे भविष्यात हे घातक ठरू शकते.
- सेक्स कमी करत असल्यास हार्मोनल ऍक्टिव्हिटी वर परिणाम होऊ शकतो याचा थेट परिणाम कामात लक्ष न लागणे, चिड चिड होणे, असा होण्याची शक्यता आहे.
सेक्स ला पर्याय काय?
मित्रहो! सेक्स म्हणजे केवळ पेनिट्रेशन नव्हे तर ती प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्वतःच्या शरीराला सेक्स साठी तयार करत असता तेव्हा अधिक महत्व असते. त्यामुळे सेक्स मिळत नसल्यास Erotic स्टोरीज वाचून निदान शरीराला फोरप्लेची फिलिंग मिळवून द्या. पॉर्न व्हिडीओज सुद्धा यासाठी योग्य पर्याय ठरू शकता. तुम्हाला सेल्फ लव्ह करणे हा सुद्धा पर्याय विचारात घेता येईल. मास्टर्बेशन म्हणजेच हस्तमैथुन करून तुम्ही पार्टनरशिवाय तो शेवटचा क्षण अनुभवू शकाल.
(टीप - वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे त्यास सल्ला समजू नये. डॉक्टरांशी संवाद साधून सुद्धा तुम्ही ही माहिती जाणून घेऊ शकता)