मुलींच्या पोटात काही गोष्टी राहत नाही असे नेहमीच म्हटले जाते. कारण मुली कधीच कोणत्या सीक्रेट आपल्याजवळ न ठेवता त्या तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणीला सांगतात. तसेच काही मुली त्यांच्या गुपित एखाद्याला सांगण्यासाठी सुद्धा चिंता व्यक्त करतात. काही मुली अशा असतात त्यांना आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याकडून काही अपेक्षा ठेवतात. त्या स्पष्टपणे त्यांना त्याबाबत सांगतात. पण काहीजणी त्यांच्या पार्टनरला एखादी गोष्टी सांगायची असते तरीही त्या सांगण्यापूर्वी काय करावे याचा विचार करतात.रिलेशनशिपमध्ये एकमेकांकडून खुप आशाअपेक्षा ठेवल्या जातात. मात्र जर पार्टनर एखादी अपेक्षा पूर्ण करत नसेल तर नात्यात दूरावा येण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत तरुण किंवा तरुणीला सावध राहणे आवश्यक आहे. एखाद्या नात्यात पडण्यापूर्वी त्याबाबत आधी विचार करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक वेळी बायको किंवा प्रेयसी तिच्या पार्टनरला एखादी गोष्ट सांगत नाहीत. तर जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गर्लफ्रेंड त्यांच्या बॉयफ्रेंडकडून अपेक्षा करतात.
-प्रामाणिकपणा
जर एखादा तरुण किंवा नवरा त्याच्या महिला पार्टनरसोबत प्रामाणिक वागत असेल तर ती सुद्धा त्याच्या सोबत तसेच वागण्याचा प्रयत्न करते. तसेच खोटे बोलणे खासकरुन महिलांना आवडत नाही. त्यामुळे रिलेशनशिप्समधील एकमेकांना समजून घेत नेहमीच खरे बोलावे.
-संवेदना
असे म्हटले जाते की मुली अधिक संवेदनशील असतात. तसेच मुली स्वत: संवेदनशील असल्याने त्यांच्या पार्टनरनेसुद्धा तसेच असावे असे त्यांना वाटत असते. काही मुल ही प्रॅक्टिकल विचार करणारी असतात मात्र काही मुलींना ही गोष्ट आवडत नाही. प्रेम हे मनापासून केले जाते त्यामुळे नात्यात संवेदनशील असणे फार महत्वाचे आहे.
-आदर
जगातील कोणत्याही नात्यात आदराची भावना असणे महत्वाचे आहे. जर तुमच्या नात्यात एकमेकांचा आदर केला जात नाही तर त्याला खरे नाते म्हणून संबोधले जाणार नाही. मुलींना त्यांच्या बॉयफ्रेंडकडून अशी अपेक्षा असते की, एकट्यात आणि समाजात त्यांचा आदर करायला हवा.(Girls Secret: मुलींच्या आयुष्यातील सर्वात मोठी 6 सिक्रेट्स, जी त्या कोणालाही सांगत नाहीत; मुलांना तर कधीच नाही)
-माफी
कधी कधी मुल एखादे भांडण झाल्यानंतर त्यांची जरी चुकी नसल्यास ते माफी मागत नाहीत. कारण माफी मागणे ही गोष्ट त्यांच्या कतृत्वाच्या विरोधात असल्याचे त्यांना वाटते. जर मुलांनी माफी मागितली नाही तर त्यांना त्यांच्या चुकीबाबत काही वाटत नसल्याचे मानतात.
त्यामुळे मुलींच्या जशा मुलांकडून अपेक्षा असतात त्याच पद्धतीने मुल सुद्धा काही गोष्टींबाबत आशा ठेवतात. तर नाते अधिक काळ टिकवायचे असल्यास एकमेकांचा आदर करण्यासोबत समजून घेणे शिका.