Girls Secret: मुलींच्या आयुष्यातील सर्वात मोठी 6 सिक्रेट्स, जी त्या कोणालाही सांगत नाहीत; मुलांना तर कधीच नाही
Girls Secret (संग्रहित संपादित प्रतिमा)

स्त्रियांचे मन अथवा त्यांचे विचार समजणे अवघड असते असे नेहमीच पुरुष म्हणत असतात. दुसरीकडे असाही एक समज आहे की, मुली स्वत:कडे कोणतीच गोष्ट गुप्त ठेवू शकत नाहीत. त्यांना काहीही सांगणे म्हणजे धोक्यातून मुक्तता नाही, मात्र यात तथ्यता नाही. बर्‍याच मुली सहजपणे त्यांच्या मनात अनेक रहस्य लपवतात. मुलींजवळ अशा अनेक गोष्टी असतात ज्या त्या कोणाबरोबरही शेअर करत नाहीत, विशेषत: आपल्या जोडीदारासोबत किंवा प्रियकरासोबत. तुम्हाला माहित त्या गोष्टी?  तुम्ही त्यांचे कितीही चांगले मित्र अथवा प्रियकर असला, परंतु मुलींना काही गोष्टी कोणालाच सांगायच्या नसतात. चला पाहूया काय आहेत या गोष्टी.

वय- मुलींना त्यांचे वय कोणालाच सांगायचे नसते. आपल्या वयाचे रहस्य त्या अगदी शेवटपर्यंत शिताफीने बाळगू शकतात. मग ती तुमची सर्वात जवळची मैत्रीण असो, वा  तुमची बहीण किंवा तुमची पत्नी असो. मुली त्यांचे खरे वय कधीच सांगत नाहीत. वय हे त्यांच्या आयुष्याची किल्ली आहे आणि आपण त्यांच्या वयानुसार त्यांच्या या रहस्याचे कुलूप उघडू शकता.

वजन- नुकत्याच झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, पुरुष आपली  उंची सांगू इच्छित नसतात, तर स्त्रिया त्यांचे वजन. एकतर जास्त वजन किंवा कमी वजन, यामुळे मुली त्यांच्या वजनाबद्दल खूपच जागरूक असतात. या दोन्ही प्रकरणांमध्ये समस्या उद्भवू शकते. वजनामुळे मुलींना हिणवलेही जाते, त्यामुळे त्या सहसा आपले वजन सांगत नाहीत.

क्रशेस- तुमच्या कॉलेजमधील एखाद्या मुलीला, कॉलेजमधीलच 'सर्वात लोकप्रिय' मुलगा आवडू शकतो. मात्र आपल्या इगोमुळे मुली ही गोष्ट कोणालाही सांगत नाहीत. इतरही ठिकाणी मुलींना कोणी आवडत असल्यास त्याबाबत त्या बोलत नाहीत. कदाचित हेच कारण आहे की मुलगी कधीच पुरुषाला प्रपोज करत नाही.

मेकअपवरील खर्च- ही अजून एक गोष्ट आहे जी मुली कोणालाही सांगत नाहीत. जसे वय मुलींच्या वैयक्तिक जीवनाची किल्ली आहे,  त्याचप्रमाणे मेकअपवरील खर्च देखील या प्रश्नाची किल्ली आहे, की 'ती कशी दिसते?'  जर तिचा मेकअपवरील खर्च जास्त असेल, तर एखाद्याला वाटू शकते की ही मुलगी दिसायला सुंदर नाही म्हणून ती मेकअपवर जास्त खर्च करते. त्यामुळे मुली ही गोष्ट सांगत नाहीत.

पगार- सर्वसामान्यपणे कोणालाही त्याचा पगार न विचाराने हे मूलभूत शिष्टाचार आहे. परंतु विचारूनही मुली ही गोष्ट कोणालाही सांगत नाहीत. मुलींसाठी पगार ही सुरक्षा आणि स्वातंत्र्याची भावना असते. (हेही वाचा: 53 टक्के विवाहित भारतीय महिलांनी ठेवले आहेत विवाहबाह्य संबंध; देशातील Married Women बाबतच्या सर्वेक्षणामधून समोर आले धक्कादायक सत्य)

डाएट- मुली कधीही त्यांच्या डाएटबाबत वाच्यता करत नाहीत, भलेही ती जाड असो वा नसो. तुमचा आहार एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगून जातो, त्यामुळे मुलींना ही गोष्ट कोणालाही सांगायची नसते.

तर, जर एखादी मुलगी तुमची खास मैत्रीण असेल, तर ती या काही गोष्टी आपल्यापासून लपवू शकते यासाठी तुम्ही मनाची तयारी केली पाहिजे.