रोजच्या धकाधकीचे जीवन, घरगुती तसेच ऑफिसेस टेन्शन यांसारख्या ताणतणावामुळे जोडपी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकून जातात. त्यामुळे सेक्ससाठी अनेकदा पुरुष वा महिला जोडीदाराकडून टाळाटाळ होते. अशा गोष्टींचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफवर (Sex Life) होतो आणि परिणामी त्यांचे वैवाहिक आयुष्यावर होतो. त्यामुळे शारीरिक सुखाचा चांगला अनुभव घेण्यासाठी पुरुष वा महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. खाण्यापिण्याच्या वेळा आणि अन्य गोष्टींवर लक्ष देऊन तुमचे आरोग्य निरोगी ठेवले पाहिजे. ज्यामुळे शरीरसुखाचा चांगला अनुभव मिळेल.
तुमची सेक्स लाईफ चांगली राहण्यासाठी काही ठराविक गोष्टीचे रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
पाहा कोणत्या आहेत या गोष्टी:
1. आवळा रस- नियमित आवळा रस प्यायल्यास तुमचे स्पर्म ची क्षमता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्ही सेक्स दरम्यान चांगला अनुभव घेऊ शकता. First Time Sex Tips: जोडीदारासोबत पहिल्यांदा संभोग करताना किती वेळ करावा Intercourse? अशा प्रकारे सुरुवात करुन घ्या Orgasm चा आनंद!
2. प्रोसेस्ड साखर खाऊ नका- या साखरेमुळे तुमची सेक्स करण्याची क्षमता कमी होते.
3. पाय आणि हाताच्या मांसपेशी मजबूत बनवा- सेक्स दरम्यान हात आणि पायाचा अधिक वापर होत असल्याने तुम्ही रोज व्यायाम करा. ज्यामुळे तुमची हाता-पायाच्या मांसपेशी मजबूत बनतील. व्यायामामुळे लिंगामध्ये रक्तसंचार चांगल्या प्रकारे होतो.
4. चांगली झोप- पुरुषांनी रोज 7 ते 8 तासांची झोप घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास टेस्टास्टरोनचा स्तर घटत जातो. ज्यामुळे सेक्स चा आनंद नीट घेता येत नाही. म्हणून रोज 7-8 तासांची झोप घेणे गरजेचे आहे.
5. फोरप्ले वर लक्ष द्या- सेक्सचा चांगला अनुभव मिळविण्यासाठी फोरप्लेवर जास्त लक्ष द्या. ज्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश करू शकाल.
यासह तुमच्या आहारात रोज हिरव्या भाज्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरात हिस्टामाइन नावाचे प्रोटीन संचार करतो. जो कामोउत्तेजना वाढविण्यास मदत करतात.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)