तसं पाहायला गेलं तरी आपल्या जोडीदारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खूप खास आणि काही औरच असतो. यात त्याने आपल्याला पहिल्यांदा मारलेली मिठी, पहिल्यांदा घेतलेले चुंबन हे कधीच विसरण्यासारखे नसते. त्याचा पहिला स्पर्श हा आपल्या अंगावर शहारा आणणारा असतो. त्याचबरोबर जेव्हा तुमच्या तुम्ही जोडीदारासोबत पहिल्यांदा सेक्स (First Time Sex Tips) करता तो अनुभव तर तुमच्यासाठी फारच रोमांचक असतो. अशा वेळी Intercourse बाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न तर काहींच्या मनात भीती असते. कारण त्याची योग्य वेळ आपल्याला कळत नाही किंवा अनेकदा आपण त्या बाबतीत अज्ञान असतो.
अशा वेळी तुम्हाला Intercourse हा किती वेळ केला पाहिजे हे माहित असणे फार गरजेचे आहे. इंटरकोर्स म्हणजे सेक्सचा मुख्य प्रकार ज्यात पुरुष आपले शिस्न स्त्रीच्या योनीत घालून सेक्सचा अनुभव घेतो. यावेळी तुम्हीला जर Orgasm चा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी Intercourse योग्य वेळ माहित असणे गरजेचे आहे. Intense Orgasm Tips: सेक्सपूर्वी फोरप्ले दरम्यान जोडीदाराच्या स्तनांसह 'या' संवेदनशील जागांना स्पर्श करुन घ्या ऑर्गेजमचा आनंद
Intercourse ची योग्य वेळ:
Intercourse मध्ये कमी सर्वात कमी, सर्वसाधारण, इच्छेनुसार आणिु सर्वात जास्त अशा वेळ असतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पहिल्यांदा सेक्स करत असाल तर जर अशा पद्धतीने जाऊ शकता.
1. सर्वात कमी
यात इंटरकोर्सची वेळ ही केवळ 1-2 मिनिट इतकी असते. ज्यात तुम्हाला कदाचित तुमच्या महिला जोडीदाराचा अंदाज घेता येईल की तिला ही गोष्ट आवडत आहे की नाही. वा काही त्रास होत आहे की नाही.
2. सर्वसाधारण
सर्वसाधारपणे थोडा वेळ वाढवून तुम्ही 3-7 मिनिटे संभोग करु शकता.
3. इच्छेनुसार
यात तुमची आणि तुमच्या जोडीदाराची इच्छा पाहता 7-13 मिनिटे ही वेळ वाढवू शकता.
4. सर्वात जास्त
Intercourse ची जास्तीत जास्त वेळ ही 10-30 मिनिटे इतकी असते.
असं म्हणतात जितका जास्त वेळ सेक्स अनुभवाल तितके तुम्ही orgasm च्या जवळ जाल. मात्र यात तुमच्या जोडीदाराची इच्छा देखील फार महत्त्वाची असते. त्यामुळे तिच्या मनाविरुद्ध इंटरकोर्स करण्यापेक्षा अशा पद्धतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून सेक्सचा चांगला अनुभव घेऊ शकाल.