पुन्हा डोके वर काढतोय 'मंकी फिव्हर'; जाणून घ्या या रोगाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

गेल्या काही वर्षांपूर्वी मंकी फिव्हर (Monkey Fever) नावाच्या रोगाचा चांगलाच बोलबाला होता. गोव्यानंतर हा रोग महाराष्ट्रातही पसरला होता. मंकी फिव्हरचा विषाणू माकडातून माणसात येतो. 2015-16 मध्ये यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे व 267 जणांना रोगाची लागण झाली होती. गेल्या वर्षी हा रोग आटोक्यात आला होता मात्र आता परत केरळच्या व्ययनाड (Wayanad) येथे या रोगाचा रुग्ण आढळला आहे. क्यासानूर फॉरेस्ट डिझीज (Kyasanur Forest Disease) असे या रोगाने मूळ नाव आहे. संसर्गजन्य असणारा हा रोग माकडांमध्ये आढळून येतो.

एका व्हायरसपासून पसरणारा 'मंकी फीवर' हा एक संसर्गजन्य रोग आहे. पहिल्यांदा 1957 साली या रोगाची लागण झालेला रुग्ण आढळला होता. कर्नाटकमधील क्यासानूर जंगलामध्ये या आजाराने पीडित असलेले एक माकड आढळले होते.

या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत - सर्दी होणं, थंडी वाजणे, ताप येणे, डोकेदुखी, स्नायूंच्या वेदना, सतत उलट्या होणे, पोटाच्या समस्या, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव होणे

मुख्यतः प्राण्यांपासून हा रोग मानवांमध्ये पसरतो. या रोगाची लागण झालेल्या प्राण्याने चावा घेतला तर या रोगाचे व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात शिरू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे हा एक संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळे याबाबत काळजी घेणे फार महत्वाची आहे. (हेही वाचा : Earphones लावून झोपणे आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?)

या रोगावर कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. मात्र प्राथमिक लक्षणांवरून काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात. केएफडीसाठी एक लस उपलब्ध असून त्याचा उपयोग भारतातील काही स्थानिक क्षेत्रांमध्ये करण्यात येत आहे.

2015 मध्ये या रोगामुळे केरळमध्ये हाहाकार माजला होता. त्यावेळी या आजाराने ग्रस्त असलेले 102 रूग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 लोकांचा मृत्यू झाला होता.