Earphones लावून झोपणे आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?
प्रतिकात्म फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

गाणी ऐकणे सर्वांना आवडते परंतु ते आरोग्यासाठी काही वेळेस फायदेशीर असल्याचे ही सांगितले जाते. मात्र तुम्हाला इयरफोन्स लावून झोपण्याची सवय आहे का? तर ही सवय त्वरीत थांबवा आणि आरोग्याच्या काळजी घ्या.

सध्या गाणी ऐकून उपचार करता येतात अशी म्यूझिक थेरपी रुग्णाला काही वेळेस दिली जाते. काही माणसांना झोपण्यापूर्वी गाणी ऐकाया खूप आवडतात. तर काही माणसांना गाणी न ऐकताच झोप लागते. मात्र सातत्याने गाणी ऐकणे हे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. तसेच माणसाच्या मेंदूवर ही परिणाम होऊ शकतो.

-Earphones लावून झोपणे धोकादायक

झोपताना गाणी ऐकण्याची सवय अत्यंत वाईट असल्याचे एका अभ्यासक्रमातून पुढे आले आहे. त्यामुळे झोपेच्या वेळेस नेहमी गाणी ऐकण्याची सवय लागण्याबरोबरच त्याचा शरिरावार परिणाम होतो. तसेच रोजच्या रोज Artifical Sound ऐकून झोपण्याची सवय असेल तर ती आरोग्यास खूप हानिकारक असते.

-Active Mode मध्ये असतो मेंदू(Brain)

नेहमी आपण आपला मोबाईल सातत्याने आपल्या बरोरच ठेवतो. तर जरा वेळसुद्धा मोबाईल बाजूला ठेवल्यास बैचेन झाल्यासारखे वाटते. अशी स्थिती आरोग्यास योग्य नसून त्याचा वाईट परिणाम मेंदूवर होतो. तसेच झोपल्यानंतर ही आपला मेंदू मोबाईलच्या सततच्या वापरामुळे Active Mode मध्ये राहिल्याने आपल्याला आराम मिळत नाही.

-कानाला होऊ शकते ईजा

जेव्हा तुम्ही गाणी ऐकत झोपता तेव्हा तुमचा मेंदू पूर्णरित्या झोपलेला नसतो. तसेच मेंदूमधील काही भाग झोप होत नसल्याने आपण झोपेत असतानाही मध्ये मध्ये उठतो. कानाला इयरफोन्स लावून झोपणे हे कानासाठी घातक ठरु शकते. कारण आपण ऐकत असलेली गाणी आणि त्याचा आवाजाचा परिणाम आपल्या कानावर होत असतो. त्यामुळे कानावर परिणाम होऊन काही वेळेस कमी ऐकण्याचा त्रास ही होतो.

-तर तुम्ही झोपताना गाणी ऐकणे बंद करायला हवे का?

प्रत्येक रात्री उत्तम झोप येणे आरोग्यासाठी उत्तम असते. तर रात्री इयरफोन्स लावून गाणी ऐकणे धोक्याचे समजे जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनावश्यक वेळी गाणी ऐकणे टाळा. तर तुमच्या स्मार्टफोनला रात्रीच्या वेळेस तुमच्या पासून दूर ठेवण्याचा प्रचयत्न करा. जरी गाणी ऐकावी असे वाटले तर रेडिओवर गाणी ऐकण्याचा प्रयत्न करा.