Palghar Shocker: पालघर जिल्ह्यात इअरफोन लावून रेल्वे रुळ (Railway Track) ओलांडताना एक्सप्रेस ट्रेनने 16 वर्षीय मुलीला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 1.10 वाजता घडली. सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. वैष्णवी रावल असे मृत तरूणीचे नाव आहे. ती माकणे गावात रहायची. रेल्वे रुळ ओलांडताना कोचुवेली-अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस (Kochuveli-Amritsar Express) ट्रेनने तिला धडक दिली. (हेही वाचा: Mumbai: पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी-रविवारी मेगाब्लॉक; तारीख, वेळ आणि इतर तपशील घ्या जाणून)
सरकारी रेल्वे पोलिसांनी या घटनेवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, मुलीने इअरफोन लावले असल्याने तिला येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही.ट्रेन ने धडक दिल्यानंतर मुलीला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आणि अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.