WHO: Declared Global Health Emergency | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना वायरस (Coronavirus) आता केवळ चीन किंवा जगातील 25-30 देशांपुरता मर्यादित राहिला नाही. त्याचा जगभरातील विविध देशांमध्ये प्रादुर्भाव वाढतच आहे. जगभरातील अनेक नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. त्यातील काहींचा मृत्यू झाला आहे. तर, काहींवर उपचार सुरु आहेत. काही संशयीत आहेत. त्यामुळे हे संकट विचारात घेऊन जागतीक आरोग्य संघटना (WHO) ने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषीत केली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार एकट्या चीन देशात तब्बल 10 हजार जणांना कोरोना वायरसची लागण झाली आहे. त्यातील 213 जणांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य आणीबाणी घोषीत करताना डब्लूएचओला चिंता व्यक्त केली आहे की, ज्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्था फारशी विकसीत नाही. किंवा सेवा सुविधांचा अभाव आहे, अशा देशांमध्ये हा वायरस अधिक वेगाने पसरु शकतो. चीनमध्ये या रुग्णाची संख्या सर्वाधिक आहे. भारतात अद्याप तरी केवळ एका व्यक्तीमध्ये या वायरसचा विषाणू आढळल्याचे समजते. दरम्यान, भारताने संभाव्य धोका ध्यानात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

जागतीक आरोग्य संघटनेचे प्रमख टीड्रोस यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस हे जगावरचे संकट आहे. त्यामुळे हे संकट रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मिळून प्रयत्न करायला पाहिजेत. आपण सर्वांनी एकी दाखवली तरच आपण हे संकट परतवून लावू शकतो. आतापर्यंत 15 देशांमध्ये या विषाणूची बाधा झाली आहे. यात चीन सर्वात आघाडीवर आहे. (हेही वाचा, केरळमध्ये Coronavirus चं निदान झालेल्या तरूणीची प्रकृती स्थिर; अजून एक रूग्ण Isolation Ward मध्ये दाखल; आरोग्यमंत्री शैलजा यांची माहिती)

दरम्यान, केवळ चीनवर व्यापारी निर्बंध अथवा चीनमध्ये जाण्यास प्रवासबंधी करुन काहीही साध्य होणार नाही. चीन आवश्यक ती सर्व काळजी घेण्यचा प्रयत्न करत आहे. चीनने वुहान आणि इतरही काही शहरं पूर्ण बंद ठेवली आहेत. वुहान हे कोरोना व्हायरसच्या विषाणूचे प्रमुख केंद्र आहे. कोरोना वायरसचा पहिला रुग्ण हा वुहान प्रांतातच आढळल्याचेही टीड्रोस यांनी म्हटले आहे.