Bird Flu Alert: 'बर्ड फ्लू' चा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे? अंडी-चिकन खरेदी करताना घ्या 'ही' खबरदारी
बर्ड फ्लू (फोटो सौजन्य- फेसबुक)

Bird Flu Alert: बर्ड फ्लू नावाच्या आजारामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि केरळमध्ये या आजाराची खात्री झाली आहे. हा रोग इन्फ्लूएंझा टाइप-ए H5N1 विषाणूमुळे होतो. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, H5N1 संसर्ग झालेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे 60 टक्के आहे. याचा अर्थ असा आहे की, या रोगाचा मृत्यू दर कोरोना विषाणूपेक्षा जास्त आहे. या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे जाणून घेऊयात...(Birds Death Rate Increased in Maharashtra: आगोदर कोंबड्या आणि आता कावळे, बगळे, गिधाडे, पोपट; राज्यात पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले)

पक्ष्यांशी संपर्क टाळा-

H5N1 विषाणूचा धोका टाळण्यासाठी आपण पक्ष्यांशी थेट संपर्क साधू नये. घरगुती पोल्ट्री फार्मचे पक्षी संक्रमित झाल्यानंतर, मनुष्यांमध्ये ते पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. पक्ष्यांच्या विष्ठा, लाळ, नाक-तोंड किंवा डोळ्यांमधून होणाऱ्या स्त्रावातून हा रोग पसरू शकतो. त्यामुळे योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

स्वच्छता -

छतावर ठेवलेल्या टाक्या, रेलिंग डिटर्जंटने स्वच्छ करा. पक्ष्यांच्या विष्ठा किंवा पंखाचा कचरा व्यवस्थित स्वच्छ करा. पक्ष्यांपासून विशिष्ट अंतर ठेवा. एच 5 एन 1 संक्रमित पक्षी सुमारे 10 दिवसांपर्यंत मल किंवा लाळ द्वारे व्हायरस सोडू शकतो. (Chicken Found Dead In Maharashtra: कोंबडी मरण्याचे सत्र महाराष्ट्रात सुरुच, लातूरमध्ये 350 कोंबड्या ठार; अनेकांना सतावतोयत Bird Flu संसर्गाचा धोका)

कच्चे मांस -

दुकानातून कोंबडीचे मास खरेदी केल्यावर, ते धुताना हातमोजे आणि तोंडावर मास्क लावा. कच्चे मांस किंवा अंडी देखील माणसाला संक्रमित करू शकतात. दूषित पृष्ठभागामुळे आपल्याला व्हायरसची लागण होऊ शकते. म्हणून पोल्ट्री फार्म किंवा दुकानाच्या कोणत्याही गोष्टी किंवा पृष्ठभागास स्पर्श करणे टाळा. कोणत्याही गोष्टीला स्पर्श केल्यानंतर लगेचचं हात स्वच्छ करा.

मास चांगले शिजवा -

सुमारे 100 अंश सेल्सिअस तापमानात कोंबडीचे मास शिजवा. कच्चे मांस किंवा अंडी खाण्याची चूक करू नका. आरोग्य तज्ञांच्या मते हा विषाणू उष्णतेस संवेदनशील आहे आणि स्वयंपाकाच्या तापमानात तो नष्ट होतो. कच्चे मांस किंवा अंडी इतर खाद्यपदार्थापासून वेगळी ठेवावीत.

'या' गोष्टी देखील लक्षात ठेवा -

पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या लोकांपासून दूर रहा आणि प्रभावित भागात जाणे टाळा. आरोग्यसेवकाच्या जवळ जाऊ नका. घरात कोणत्याही संक्रमित व्यक्तीपासून काही अंतर ठेवा. ओपन एअर मार्केटमध्ये जाण्यापासून टाळा आणि स्वच्छता-हँडवॉश यासारख्या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

अर्धवट शिजवलेले अन्न खाऊ नका -

अनेकदा जिममध्ये जाणारे लोक हाफ बॉयल किंवा हाफ फ्राइड अंडी खातात. बर्ड फ्लू रोखण्यासाठी ही सवय त्वरित बदला. अर्धवट शिजलेले मास आणि अंडी खाणे आपल्याला आजारी बनवू शकते.

चिकन कशे खरेदी करावे -

कोंबडी फार्ममध्ये कमकुवत आणि आजारी दिसत असलेल्या कोंबडीचे मांस खरेदी करणे टाळा. या पक्ष्याला H5N1 विषाणूची लागणही होऊ शकते. कोंबडी खरेदी करताना पूर्ण खबरदारी घ्या. केवळ स्वच्छ कोंबडी खरेदी करा.

बर्ड फ्लूची लक्षणे-

बर्ड फ्लूची लक्षणे फ्लूच्या लक्षणांप्रमाणेचं असतात. जर आपणास एच 5 एन 1 संसर्गाची लागण झाली असेल तर आपल्याला खोकला, अतिसार, श्वसन समस्या, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अस्वस्थता, सर्दी किंवा घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवू शकतात.