Birds Death Rate Increased in Maharashtra: आगोदर कोंबड्या आणि आता कावळे, बगळे, गिधाडे, पोपट; राज्यात पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले
Birds in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस संकटाने 2020 हे वर्ष माणसासाठी सैरभर करुन सोडले. हे वर्ष सरले आणि आता 2021 हे वर्ष सुरु झाले. हे वर्ष आता पक्षांसाठी धोकादायक ठरते की काय अशी भीती व्यक्त होते आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यातच यंदा पक्षी मृत्यूचे प्रमाण (Birds Death Rate Increased in Maharashtra) वाढल्याचे चित्र आहे. राज्यात आगोदरच कोंबड्यांच्या (Chicken ) मृत्यूमुळे नागरिक चिंतेत आहेत. आता तर कावळे (crows), बगळे (Herons), गिधाडे (Vulture) आणि पोपट (Parrots) अशा पक्षांचे मृत्यू ( (Birds Death ) मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पुढे आले आहे.

नागपूरमध्ये 500 पक्षांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात चिमन्या, पोपट, कावळे अशा सुमारे 500 पक्षांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना नागपूर शहरापासून लगत असलेल्या कोढाळी भागातील रिंगणाबोडी, माणिकवाडा, मसाळा, शिवा, आकेवाडा आदी भागांमध्ये घडली.

बीड जिल्ह्यात एकाच ठिकाणी 26 कावळ्यांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे 26 कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. परिसरात एखादा पक्षी मृत झाल्याचे दिसणे नवे नाही. परंतू, एकाच वेळी एकाच प्रकारच्या पक्षांचे बहुसंख्याक पद्धतीने मृत्यू होणे हे चिंता आणि कुतूहल वाढवणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी या घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने दिली आहे. (हेही वाचा, Chicken Found Dead In Maharashtra: कोंबडी मरण्याचे सत्र महाराष्ट्रात सुरुच, लातूरमध्ये 350 कोंबड्या ठार; अनेकांना सतावतोयत Bird Flu संसर्गाचा धोका)

ठाणे येथे 14 पाणबगळे, 2 पोपट ठार

कावळे, चिमन्यांसोबत आता पाणबगळ्यांचाही मृत्यू झाल्याचे समजेत. ठाणे येथील वाघबीळ परिसरात 14 बगळे मृतावस्थेत सापडले आहेत. पाणबगळ्यांसोबतच काही पांढरे बगळेही मृत्यू पावल्याचे समजते. मात्र, त्याचा एकूण आकडा समजू शकला नाही. याशिवा याच परिसरात दोन पोपटही मृतावस्थेत सापडले आहेत. याच परिसरात दोन दिवसांपूर्वी एक युरेशियन गिधाड मृतावस्थेत सापडले आहे.

अज्ञात कारणांमुळे एकाच वेळी मृत्यू पावणाऱ्या पक्षांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अचानक घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या पशूवैद्यकीय विभागाने वेळच या घटनेची नोंद घेऊन उपाययोजना करायला हव्यात. तसेच, पक्षांच्या मृत होण्याचे कारण शोधून काढायला हवे, अशी मागणी होत आहे.