Monkeypox Virus: मंकीपॉक्स आजाराचे दोन नवे विषाणू आढळले; पाहा लक्षणे; Coronavirus नंतर  नवे आव्हान!
Monkeypox Virus | (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीने जगभरात आव्हान निर्माण केले आहे. हे आव्हान अद्यापही पुरते नियंत्रणात आले नाही. त्यामुळे अवघे जग प्रयत्न करत आहे. तोवर आणखी एक नवे आव्हान जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांसमोर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. हे आव्हान म्हणजे वेल्स (Wales) येथे सापडलेले दोन नवे विषाणू. हे विषाणू मंकीपॉक्स (Monkeypox) या आजाराचे आहेत. मंकीपॉक्स हा आजार (Monkeypox Disease) आगोदरपासून अस्तित्वात आहे. परंतू, त्याचे दोन नवे विषाणून आढलल्याने सतर्कता व्यक्त केली जात आहे. या विषाणूबाबत माहिती देताना पब्लिक हेल्थ वेल्स ने म्हटले आहे की, एकाच कुटुंबाती दोन व्यक्तींमध्ये हे मंकीपॉक्सचे दोन विषाणू आढळले आहेत. या दोन्ही व्यक्ती एकाच घरात राहात असल्याचेही वेल्स म्हटले आहे.

पब्लिक हेल्थ वेल्सने अधिक माहिती देताना सांगितले की, ज्या दोन व्यक्तींमध्ये हे विषाणू आढलले ते दोघे विदेशा संक्रमित झाले आहेत. मंकीपॉक्स हा जुनाच विषाणू आहे. हा विषाणू प्रामुख्याने अफ्रीकी देशांमध्ये आढळतो. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मंकीपॉक्सचे दोन नवे विषाणू आढळलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या विषाणूचा इतरही काही नागरिकांना संसर्ग झाला आहे का यावर इंग्लंडचा सार्वजनिक आरोग्य विभाग लक्ष ठेऊन आहे. (हेही वाचा, White Fungus: देशात ब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाईट फंगस’चे संकट; Mucormycosis पेक्षा आहे अधिक धोकादायक )

इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार रिचर्ज फर्थ यांनी या नव्या विषाणूबाबत माहिती देताना सांगितले की, मंकीपॉक्सच्या नव्या विषाणूची लागण झाल्याची घटना अपवादात्मक आहे. तसेच या विषाणूमुळे निर्माण होणारी जोखीमही तशी कमी आहे. या विषाणूंची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची आम्ही तपासणी करत आहोत. हे संपर्कात आलेले लोकही इतरांच्या कोणाच्या संपर्ता आले आहेत का याचाही आम्ही शोध घेत आहोत.

काय आहे मंकीपॉक्स?

मंकीपॉक्स हा एक प्रकारचा विषाणूजन्य आजार आहे. मंकीपॉक्सचा विषाणूअत्यंत लाहाण असतो. तो इतर विषाणुंसारखा जीवघेणा नाही. अभ्यासकही सांगतात की, या विषाणूच्या संक्रमणाचे प्रमाणही बरेच कमी असते. प्रामुख्याने हा विषाणून उष्णकटीबंधातील प्रदेशात आढळतो. प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम अफ्रीकी देशांमध्ये.

मंकीपॉक्स आजाराजी लक्षणे

सुरुवातीच्या काळात ताप, डोकेदुखी, शरीरावर सूज, कंबरदुखी, स्नायू आकडणे (क्रँम्प), कणकण (अंगदुखी) , शरीरावर देवीसारखे फोड्या (चीकनपॉक्स), शरीरात ताप येऊन अंगावर फोड्या (चिकनपॉक्ससारख्या) येणे, प्रामुख्याने या विषाणूची लागण झाल्यानंतर फोड्या येण्यास शक्यतो चेहऱ्यावर फोड्या येण्यास सुरुवात होते. त्यानंतर या फोड्या शरीराच्या इतर भागावर पसरत जातात. या फोड्या तळहात आणि तळपायांसह शरीराच्या विविध भागांवर येतात. या आजाराचा बहर साधारण 12 ते 14 दिवसांपर्यंत राहतो. योग्य उपचार आणि वेळेत निधान झाले तर या आजारातून व्यक्ती लगेच बरा होतो. परंतू, योग्य उपचार न झाल्यास आणि आजारास गांभीर्याने न घेतल्यास अफ्रिकी देशांमध्ये हा आजार जीवघेणा ठरल्याचीही उदाहरणे आहेत.