प्रदूषण, बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन यामुळे माणूस अनेक आजारांनी ग्रासलेला पाहायला मिळतो. किंबहुना लोकांना बरेच वेगवेगळे आजार झालेले पाहायला मिळतात. हिरवीगार झाडे, पोषक वातावरण यामुळे शुद्ध झालेली हवा ही सध्या काँक्रिटीकरणाच्या जंगलामुळे नाहीशी झाली आहे. ज्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर झालेला पाहायला मिळत आहे. पुरुषांसोबत महिलांमध्येही अनेक प्रकारचे आजार पाहायला मिळत आहे. त्यात एक आजार महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आहे तो म्हणजे 'स्तनांचा कर्करोग' (Breast Cancer).
स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला कर्करोग आहे. त्यामुळे महिलांचे मृत्यु होण्याचे प्रमाणही वाढतेय. याचे मुख्य कारण म्हणजे या कर्करोगाचे निदान लवकर होत नाही. किंबहुना अनेक महिलांना तसे आढळून जरी आले तरी त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र जर का याकडे दुर्लक्ष केले आणि आणि त्या कर्करोगाची शेवटची स्टेज असेल तर महिलेचा मृत्यू निश्चित आहे असे समजावे. Breast Cancer Awareness Month : 'या' गोष्टी केल्यास कमी होईल ब्रेस्ट कॅन्सरचा धोका !
जाणून घ्या स्तनांचा कर्करोग होण्याची लक्षणे:
1. स्तनात गाठ.
2. बोंडातून द्राव येणे.
3. आत वळलेले बोंड.
4. बोंड लाल होऊन वेदना होणे.
5. अचानक स्तनाचा आकार वाढणे.
6. अचानक स्तन आकुंचन पावणे.
7. स्तन घट्ट होणे.
8. स्नायूंच्या वेदना, पाठदुखी
वयाच्या 12 व्या वर्षाच्या आधी मासिक पाळी सुरु होणे, वयाच्या 50 वर्षानंतर रजोनिवृत्ती संपणे, मूल झालेले नसणे तसेच मद्यपान, अधिक चरबीयुक्त आहार, चोथायुक्त अधिक आहार, धूम्रपान, लठ्ठपणा आणि आधी गर्भाशयाचा किंवा कोलोनचा कर्करोग झालेला असणे, अशा महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा अधिक धोका असतो. यावर उपाय एकच या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.