
ऑक्टोबर हा महिना जगभरात 'ब्रेस्ट कॅन्सर अव्हेरनेस मंथ' म्हणून साजरा केला जातो. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करणे हाच यामागचा उद्देश आहे. पण भारतात या आजाराबद्दल हवी तितकी जागरुकता नाही. या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि अनेक महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या विळख्यात सापडत आहेत.
कोणत्याही आजारावर उपचार घेण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून काळजी घेणे अधिक योग्य ठरते. तसंच ब्रेस्ट कॅन्सर पहिल्या दोन टप्प्यात असल्यास उपचाराने तो बरा होऊ शकतो. म्हणूनच या काही गोष्टी केल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळता येईल....
नियमित तपासण्या करा
स्तन कॅन्सर संबंधित नियमित तपासण्या करणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांनी प्रत्येक वर्षी स्क्रीनिंग, मेमोग्राफी यांसारख्या तपासण्या करायला हव्यात. यामुळे कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात होण्यास मदत होईल. या '5' लक्षणांवरुन ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका !
पोष्टिक आहार घ्या
महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जंक फूडचे सेवन कमी करावे. त्याऐवजी अंडे, मासे, सोयाबीन, दही, दूध, फळे, भाज्या, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा. त्याचबरोबर प्रोटीनयुक्त आहार घेणेही फायदेशीर ठरेल. ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात या '6' पदार्थांचा समावेश करा !
वजन नियंत्रित ठेवा
वजन नियंत्रित ठेवल्याने अनेक आजार दूर राहण्यास मदत होईल. स्तन कॅन्सर देखील त्यापैकीच एक आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामने घरच्या घरी सुरूवातीच्या टप्प्यावर ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका
स्तनपान करणे टाळू नका
काही महिला स्तनपान करण्यास विनाकारण घाबरतात. स्तनपान करणे महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायाम करण्याचे अनेक फायदे आपल्याला ठाऊक आहेत. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्या महिला आठवड्यातून 5 दिवस कमीत कमी 30-40 मिनिटे व्यायाम करतात, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.