Coronavirus पेक्षाही 'हे' 7 रोग आहेत अधिक धोकादायक; वैज्ञानिकांकडून सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या सविस्तर
धोकादायक व्हायरस (PC-Wikimedia Commons and pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात थैमान घातलं आहे. या प्राणघातक विषाणूने केवळ लोकांचा जीव घेतला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थाही ढासळली आहे. तथापि, आता कोरोना विषाणूवर लस आल्याने नागरिकांमध्ये या आजारापासून मुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. कोविड-19 चा धोका लक्षात घेता, आता वैद्यकीय तज्ञ नागरिकांना इतर रोग आणि संक्रमणांपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. नागरिकांनी योग्य दक्षता घेतली नाही तर भविष्यात ही महामारी उद्भवू शकते. खालील मुद्द्यांच्या आधारे कोरोनापेक्षा घातक आजारांबद्दल जाणून घेऊयात...(Bird Flu Alert: 'बर्ड फ्लू' चा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे? अंडी-चिकन खरेदी करताना घ्या 'ही' खबरदारी)

इबोला-

आफ्रिकेत इबोलाचे संक्रमण झाल्याचं आढळून आलं आहे. हा आजार खूपचं जीवघेणा आहे. हा रोग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. डब्ल्यूएचओचा दावा आहे की, इबोला देखील एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला संक्रमित करू शकतो. नुकत्याच नोंदविलेल्या आकडेवारीनुसार इबोलाच्या 3400 प्रकरणांपैकी 2270 लोकांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी 2020 मध्ये इबोलाची लसदेखील बनवण्यात आली होती. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, इबोला रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम दिसून येतील.

लासा फिवर -

लासा ताप हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. ज्यामुळे रक्तस्रावाच्या आजाराची लक्षणे उद्भवतात. लासा तापाने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या मूत्रपिंड, यकृत आणि प्लीहावर फार वाईट परिणाम होतो. दूषित घरगुती वस्तू, लघवी, मल आणि रक्त संक्रमणाद्वारे हा आजार लोकांमध्ये पसरतो. हा आजार आफ्रिकन देशांमध्ये अजूनही तीव्र आहे. या आजारामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून यावर अद्याप लस आलेली नाही.

मार्गबर्ग व्हायरस डिसीज-

हा रोग अत्यंत संक्रमित आहे. जिवंत किंवा मेलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यानेदेखील मार्गबर्ग डिसीज पसरतो. 2005 साली युगांडामध्ये या साथीच्या आजाराचा पहिला प्रादुर्भाव दिसून आला व त्यात 90 टक्के संसर्ग झालेल्या लोकांचा मृत्यू झाला.

MERS-COV-

दि मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम' (MERS) देखील एक अतिशय धोकादायक संसर्ग आहे. जो रेस्पिरेटरी ड्रॉपलेटद्वारे मानवांमध्ये पसरतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, "आज या आजाराची भीती कमी झाली असली तरी जगभरात त्याचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे श्वसनाच्या स्वच्छतेत चूक किंवा दुर्लक्ष."

SARS -

सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) हा देखील एक घातक आजार आहे. 2002 मध्ये चीनमध्ये या आजाराची पहिली घटना नोंदवली गेली. SARS 26 देशांमध्ये पसरला असून सुमारे 8,000 लोकांना याचा फटका बसला आहे. या आजाराचा मृत्यू दर जास्त आहे. हा आजार कोरोना विषाणूप्रमाणेचं आहे.

निपाह व्हायरस-

निपाह विषाणू 2018 मध्ये केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला होता. परंतु, हा आजारावर यशस्वीरित्या नियंत्रणात आण्ण्यात आला होता. परंतु, त्याची लक्षणे आणि संक्रमणाच्या पद्धती भविष्यात त्याचा प्रसार होण्याची शक्यता वाढवतात. या आजारामुळे रुग्णांमध्ये जळजळ, सूज, डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणे आदी लक्षणं दिसतात.

डिसीज एक्स-

गेल्या काही दिवसांपासून या आजारासंदर्भात अनेक बातम्या येत आहेत. 2021 मध्ये हा साथीचा रोग म्हणून उदयास येईल, अशी भीती वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. जवळजवळ चार दशकांपासून इबोला साथीच्या रोगावर काम करणारे जीन जॅक मुम्बे म्हणतात, "जग कोरोनाशी झुंज देत आहे आणि त्यादरम्यान एका नवीन विषाणूचा धोका वाढला आहे. डिसीज एक्स हे नवीन विषाणूचे नाव आहे. हा आजार इतर साथीच्या रोगांपेक्षा अत्यंत भयंकर असू शकतो.