आजकालच्या बदललेल्या, धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे हृदयाच्या अनेक समस्या उद्बवतात. परिणामी हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जीवघेण्या हार्ट अटॅकची काही लक्षणे अॅटक येण्यापूर्वी दिसू लागतात. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा अनेकदा तर ही अटॅकची लक्षणे आहेत, हे ठाऊकही नसते. म्हणूनच या वर्ल्ड हार्ट डे निमित्त जाणून घेऊया हार्ट अटॅकची लक्षणे...
छातीत अस्वस्थता
हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसणाऱ्या लक्षणांपैकी हे प्रमुख लक्षण आहे. छातीत दबाव किंवा जळजळ होत असल्यास तात्काळ डॉक्टरांची भेट घ्या.
थकवा
कोणत्याही कामाशिवाय किंवा मेहनतीशिवाय थकवा जाणवत असेल तर हा हॉर्ट अटॅकचा संकेत आहे. हृदयातील रक्तवाहिन्या कोलेस्ट्रॉलमुळे बंद किंवा आकुंचित होतात तेव्हा लवकर थकवा जाणवू लागतो. अशावेळी चांगली झोप झाल्यानंतरही आळस, थकवा जाणवू लागतो आणि दिवसा देखील झोप, आरामाची गरज भासू लागते. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत देतात ही '७' लक्षणे !
सूज
हृदयाला शरीरातील सर्व भागात रक्तपुरवठा करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते तेव्हा रक्तवाहिन्यांना फुगतात आणि त्यांना सूज येण्याची शक्यता वाढते. यामुळे विशेष करुन पायांचे तळवे, घोटा आणि इतर भागात सूज जाणवू लागते. तर कधी ओठ निळसर होतात.
सतत सर्दी असणे
सतत दीर्घ काळ सर्दी असणे हा देखील हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. शरीरात रक्तसंचार होण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते तेव्हा फुफ्फुसात रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते. सर्दी किंवा कफ लालसर दिसत असण्यास फुफ्फुसातील रक्तस्त्राव हे देखील कारण असू शकते.
चक्कर येणे
हृदय कमजोर झाल्यानंतर त्याद्वारे होणारा रक्तसंचार देखील सीमित होतो. अशावेळी मेंदूला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि चक्कर येऊ लागते. हे हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्वरीत डॉक्टरांची भेट घेणे योग्य ठरेल.
श्वास घेण्यास त्रास होणे
याशिवाय श्वास घेण्यास काही अडसर येत असल्यास किंवा श्वासाच्या लयीत बदल होत असल्यास हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. हृदयाचे कार्य सुरळीत होत नसल्यामुळे फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. परिणामी श्वास घेण्यास अडथळा निर्माम होतो. हार्ट अटॅक जीवावर बेतण्यापूर्वीच ठेवा या ५ गोष्टींचं भान