Snakebite Treatment: आरोग्य मंत्रालयाने भारतात सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी (Prevention and Control of Snakebite Envenoming) राष्ट्रीय कृती योजना सुरू केली. 'वन हेल्थ' दृष्टिकोनाद्वारे 2030 पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू निम्मे करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यावेळी सर्पदंशावरील पुस्तिका, सर्वसामान्यांसाठी 'काय करावे आणि काय करू नये' या विषयावरील पोस्टर्स आणि सर्पदंश जनजागृतीवर 7 मिनिटांचा व्हिडिओदेखील लाँच करण्यात आला. या व्हिडिओद्वारे सरकारने विषारी साप चावल्यानंतर मृत्यू टाळण्यासाठी काय करावे आणि करू नये याची माहिती नमूद केली आहे. साप चावण्यापासून कसे टाळता येईल याबद्दल काही सावधगिरी देखील आरोग्य मंत्रालयाने शेअर केली आहे.
हा व्हिडिओ शेअर करत आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, ‘काही खबरदारी घेतल्यास सर्पदंश टाळता येतो. जर एखाद्याला साप चावला असेल तर योग्य उपचारासाठी या व्हिडिओमध्ये दर्शविलेल्या पद्धतींचा अवलंब करा. थोडासा समजूतदारपणा दाखवूया आणि साप चावल्याने होणारे मृत्यू रोखूया!’
पहा व्हिडिओ-
कुछ सावधानियों को अपना कर सांप के काटने से बच सकता है।
यदि किसी को सांप ने काट लिया है तो उचित उपचार के लिए इस वीडियो में दिखाए गए तरीकों को अपनाएं।
आइए थोड़ी सी सूझ-बूझ अपना कर हम सर्पदंश से होने वाली मृत्यु पर रोक लगाएं!#SnakeBite pic.twitter.com/r28ZD3KPua
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) March 12, 2024
यासह सरकारद्वारे सर्पदंशाच्या घटनांनी प्रभावित झालेल्या व्यक्ती आणि समुदायांना तात्काळ मदत, मार्गदर्शन आणि समर्थन देण्यासाठी सर्पदंश हेल्पलाइन क्रमांक (15400) पाच राज्यांमध्ये (पुद्दुचेरी, मध्य प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश आणि दिल्ली) सुरू केला जाणार आहे. भारतात, सुमारे 90% सर्पदंश हे कॉमन क्रेट, इंडियन कोब्रा, रसेल वाइपर आणि सॉ स्केल्ड वाइपर या चार प्रमुख प्रजातींच्या सापांमुळे होतात. मात्र सर्पदंश पीडितांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आरोग्य सुविधांचा अभाव हे चिंतेचे कारण आहे. (हेही वाचा: Sleep Deprivation: जर तुमचीही झोप कमी होत असेल तर व्हा सावध! स्मरणशक्तीसोबतच मेंदूवरही होऊ शकतो विपरीत परिणाम, जाणून घ्या काय सांगतो AIIMS चा अभ्यास)
दरम्यान, विषारी साप चावल्यानंतर 'सर्पदंश' हा संभाव्य जीवघेणा आजार ठरू शकतो. विषारी साप चावल्याने वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात ज्या घातक ठरू शकतात किंवा वेळेवर आणि योग्य उपचार न दिल्यास कायमचे नुकसान होऊ शकतात. भारतात दरवर्षी अंदाजे 3-4 दशलक्ष सर्पदंशांमुळे सुमारे 50,000 मृत्यू होतात, जे जागतिक स्तरावर सर्व सर्पदंश मृत्यूंपैकी निम्मे आहेत. अहवालानुसार (2016-2020) भारतात सर्पदंशाच्या घटनांची सरासरी वार्षिक संख्या सुमारे 3 लाख आहे आणि सुमारे 2000 मृत्यू सर्पदंशामुळे होतात.